afganistan

अमेरिकेने मानवतेच्या कारणास्तव जर गोठवलेला निधी तातडीने खुला केला नाही तर अफगाणिस्तानातील उद्योग रसातळाला जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे. आधीच गेल्या महिन्याभरापासून अफगाणिस्तानातील उद्योग आणि आंतरराष्ट्रीय बॅंकांमधील व्यवहार ठप्प झाले आहेत.

    काबूल : अफगाणिस्तानात दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. येथील खासगी उद्योग आर्थिक अडचणी असून यासाठी त्यांनी अमेरिकेकडे मदत मागितली आहे. अमेरिकेने गोठवलेला निधी तातडीने खुला करण्यात यावा, अशी मागणी अफगाणिस्तान चेबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इन्व्हेस्टमेंट, अफगाणिस्तान चेंबर ऑफ माईन्स ओऍओन्ड इंडस्ट्रीने एका पत्रकार परिषदेत ही मागणी केली आहे.

    अन्यथा अफगाणिस्तानातील उद्योग कोसळेल
    अमेरिकेने मानवतेच्या कारणास्तव जर गोठवलेला निधी तातडीने खुला केला नाही तर अफगाणिस्तानातील उद्योग रसातळाला जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे. आधीच गेल्या महिन्याभरापासून अफगाणिस्तानातील उद्योग आणि आंतरराष्ट्रीय बॅंकांमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व आर्थिक व्यवहारही थांबले आहेत. जर ही स्थिती कायम राहिली तर अफगाणमधील खासगी उद्योगापुढे मोठी आर्थिक मंदी येऊ शकते, अशीही शक्‍यता या संस्थांनी व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्राने अफगाणिस्तानातील नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करावे. तसेच अफगाणमधील नागरिकांसाठीची मानवता विषयक मदतही करावी, असेही आवाहन या संस्थांनी केले आहे.