मागील २४ तासांत इंडोनेशियासह जगभरातील १० देशांत कोरोनाचा उद्रेक, अमेरिकेत मिळाले सर्वाधिक रूग्ण

 भारतात आतापर्यंत कोरोनामुळं ४ लाख १० हजार जणांचा मृत्यू झाला आहे, तर इंडोनेशियात आतापर्यंत ६८ हजार मृत्युंची नोंद झाली आहे. इंडोनेशियात कोरोनाची लाट वाढत चालली असून गेल्या २४ तासांत ४७ हजार ८९९ नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.

  संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने (Corona Virus) अक्षरश:थैमान घातलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave ) भारतातील जोर ओसरत असताना इंडोनेशियामध्ये (Indonesia) कोरोनाच्या नव्या लाटेनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. अमेरिकेसह जगभरातील टॉप-५ देशांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत.

  इंडोनेशियातील वेगवेगळ्या भागात सध्या कोरोना पसरत असून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत असल्याचं दिसून येत आहे. इंडोनेशियानं आता भारतालाही मागे टाकलं असून गेल्या २४ तासांत ४० हजारांपेक्षाही अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

  भारतात आतापर्यंत कोरोनामुळं ४ लाख १० हजार जणांचा मृत्यू झाला आहे, तर इंडोनेशियात आतापर्यंत ६८ हजार मृत्युंची नोंद झाली आहे. इंडोनेशियात कोरोनाची लाट वाढत चालली असून गेल्या २४ तासांत ४७ हजार ८९९ नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारतात जशी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती आता इंडोनेशियात दिसत आहे.

  अमेरिकेत २८ हजार ९२३ कोरोनाचे नवीन रूग्ण मागील २४ तासांत आढळून आले आहेत. तर एकूण आकडा पाहिला असता एकूण ५६ दिवसांत सर्वात अधिक रूग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेमध्ये ४९ टक्के इतकं व्हॅक्सीनेशन पूर्ण झालं असून ७७ टक्के लोकांना प्रत्येकी एक डोस देण्यात आला आहे. तरीसुद्दा राज्यात केसेस वाढत चालल्या आहेत.

  ब्रिटेनमध्ये नागरिकांना दोन डोसेस देण्यात आले आहेत. त्यानंतर १९ जुलैनंतर लॉकडाऊनमध्ये पुर्णपणे शिथिलता देण्यात येणार आहे. परंतु मागील २४ तासांत ब्रिटेनमध्ये ३६ हजार ६६० इतके नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर स्पेनमध्ये ४३ हजार ९६० आणि ब्राझीलमध्ये ४५ हजार ९४ इतके एकूण रूग्ण आढळून आले आहेत.

  तुम्हाला या बातमी बद्दल काय वाटते? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…