tb patient

कोरोना संसर्गानंतर (Corona Spread)वर्षभरानंतरही अनेकांना थकवा आणि श्वास घेताना त्रास होत असल्याचे चीनमधील एका अहवालातून(Chinese Report) समोर आले आहे.

    कोरोनातून(Corona) बरे झालेल्या लोकांना एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. कोरोना संसर्गानंतर (Corona Spread)वर्षभरानंतरही अनेकांना थकवा आणि श्वास घेताना त्रास होत असल्याचे चीनमधील एका अहवालातून(Chinese Report) समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या महामारीमुळे आरोग्यावर होणाऱ्या या दीर्घकालीन परिणामांना समजून घेणे आवश्यक आहे.

    द लॅन्सेट अभ्यासात सांगण्यात आलं आहे की “कोरोनासाठी रुग्णालयात दाखल झालेले आणि त्यानंतर बरं होऊन घरी सोडण्यात आलेल्या एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे १ वर्षानंतरही एकातरी लक्षणाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.अनेकदा हे लक्षण थकवा किंवा स्नायू कमकुवत होणं अशा प्रकारचे असते.”

    ‘लाँग कोविड’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संज्ञेशी किंवा आरोग्यविषयक स्थितीशी संबंधित असलेल्या या सर्वात मोठ्या संशोधनात असं म्हटलं गेलं आहे की, दर तीन रुग्णांपैकी एकाला कोरोना निदानानंतर तब्बल वर्षभरानंतरही श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे.

    अभ्यासानुसार जानेवारी ते मे २०२० दरम्यान चीनच्या वुहान शहरात कोविड – १९साठी रुग्णालयात दाखल झालेल्या सुमारे १,३०० लोकांचा अभ्यास करण्यात आला. कमीत कमी एक लक्षण असलेल्या रुग्णांचा वाटा हा सहा महिन्यांनंतर ६८ टक्क्यांवरून कमी होऊन १२ महिन्यांनंतर ४९ टक्क्यांवर इतका झाला. तर श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांनाच वाटा हा सहा महिन्यांनंतर २६ टक्के रुग्णांपासून वाढून १२ महिन्यांनंतर ३० टक्के इतका झाला आहे.

    या अभ्यासात असेही दिसून आले की, कोरोनानंतर थकवा किंवा स्नायूंच्या सतत कमकुवतपणाची समस्या जाणवणाऱ्यांमध्ये तुलनेने स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा ४३ टक्के जास्त आहे.  चिंता किंवा नैराश्याचं निदान होण्याची शक्यता दुप्पट आहे.