corona patients

चीनमध्ये कोरोना रुग्णांची(Corona Patients) संख्या परत वाढत आहे.

    जीवघेण्या ठरणाऱ्या कोरोना व्हायरसचा(Corona Virus) जन्म जिथे झाला त्या चीनमध्ये कोरोना रुग्णांची(Corona Patients) संख्या परत वाढत आहे. जगभरात जवळपास ‌३५ लाखांच्या वर लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. कोरोनाचे रूग्ण सापडू लागल्याने चीनमधील(China) ग्वांगदोंगमध्ये अनेक निर्बंध लादले आहेत.

    वृत्तसंस्था राॅयटर्सनुसार ३१ मे रोजी चीनमध्ये २३ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्याच्या आदल्या दिवशी २७ नवे रूग्ण सापडले होते. यापैकी एक डझन रूग्ण हे दक्षिण ग्वांगदोंग भागातील आहेत. दक्षिण ग्वांगदोंग हा प्रांत हाँगकाॅगला लागून आहे. या प्रांताची राजधानी ग्वागझूमध्ये लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने देखील याबाबत माहिती दिली आहे.

    चीनमधील ग्वागझूमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरू लागल्याने तेथे देखील बाजारपेठा, चाईल्ड केअर सेंटर आणि थेटर केली आहे. रेस्टॉरंट, शाळा देखील बंद करण्यात आला आहे. ग्वांगदोंमध्ये विमान, रेल्वे, बसने ये-जा करण्यासाठी मागील ७२ तासात केलेल्या कोरोना टेस्ट रिपोर्ट दाखवावा लागणार आहे.