.Mask Wearing People in israel

इस्राईलमध्ये १० लाख जणांमागे १ हजार ८९२ जणांना कोरोना(Corona Spread In Israel) होत असल्याचं समोर आलं आहे.

    इस्रायलमधून(Israel) धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्राईलमध्ये १० लाख जणांमागे १ हजार ८९२ जणांना कोरोना(Corona Spread In Israel) होत असल्याचं समोर आलं आहे. इस्राईलमध्ये सध्या कोरोनाची चौथी लाट असल्याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जगातील सर्वाधिक लसीकरण झालेला देश असुनही इस्त्रायलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. इस्रायलमध्ये जुलैपासून ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली. मात्र लसीकरणामुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे.

    इस्रायलमधील नागरिकांवर कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. ज्या लोकांना लसीचा तिसरा डोस मिळाला नाही, त्यांना प्रवास, बारमध्ये जाणे, बाहेर खाणे आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास बंदी घातली जात आहे. इस्रायली नागरिकांना त्यांच्या दुसऱ्या डोसच्या सहा महिन्यांच्या आत फायझर-बायोटेक लसीचा तिसरा डोस घेणं आवश्यक आहे.

    इस्रायलमध्ये लसीकरणाच्या जोरावर कोरोना याआधी आटोक्यात आला होता. त्यामुळे इस्रायलमध्ये मास्क घालण्याचा नियम बंद करण्यात आला होता. तसेच शिक्षण संस्थाही सुरु करण्यास परवानगी मिळाली होती. मात्र आता कोरोना रुग्ण वाढल्याने मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच देशात परदेशी पर्यटकांसाठीची लसीकरण मोहिम पुढे ढकलली गेली आहे.