Corona patients will recognize dogs by the smell of socks

गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी श्वान जसे पोलिसांना मदत करतात, तसेच कोरोना रुग्ण ओळखण्यासाठीही त्यांची आता मदत घेता येणार आहे. कोरोना संक्रमित रुग्णाच्या मोज्यांच्या वासावरून श्वान कोरोना संक्रमित रुग्ण ओळखू शकत असल्याचा दावा ब्रिटीश शास्त्रज्ञांनी केला आहे. ब्रिटीश शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात सार्स-कोविड 2 विषाणूची लागण झालेल्या लोकांच्या मोज्याच्या वासावरून प्रशिक्षित श्वान कोरोनाचा गंध ओळखू शकतील. तसेच या श्वानांना विमानतळ आणि गर्दी असणार्‍या जागांवर ठेवल्यास कोरोना संक्रमितांना ते ओळखू शकतील आणि त्याने कोरोना संक्रमण कमी होण्यास मदत होऊ शकते.

    ब्रिटन : गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी श्वान जसे पोलिसांना मदत करतात, तसेच कोरोना रुग्ण ओळखण्यासाठीही त्यांची आता मदत घेता येणार आहे. कोरोना संक्रमित रुग्णाच्या मोज्यांच्या वासावरून श्वान कोरोना संक्रमित रुग्ण ओळखू शकत असल्याचा दावा ब्रिटीश शास्त्रज्ञांनी केला आहे. ब्रिटीश शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात सार्स-कोविड 2 विषाणूची लागण झालेल्या लोकांच्या मोज्याच्या वासावरून प्रशिक्षित श्वान कोरोनाचा गंध ओळखू शकतील. तसेच या श्वानांना विमानतळ आणि गर्दी असणार्‍या जागांवर ठेवल्यास कोरोना संक्रमितांना ते ओळखू शकतील आणि त्याने कोरोना संक्रमण कमी होण्यास मदत होऊ शकते.

    तसेच शास्त्रज्ञांनी सांगितले की, दोन ग्रुपमध्ये काम करून कोविड-प्रशिक्षित श्वान अवघ्या अर्ध्या तासाच्या आत विमानातून आलेल्या अनेक प्रवाशांच्या मोज्यांच्या वासावरून कोरोना रुग्ण ओळखू शकतात. या शास्त्रज्ञांनी प्राथमिक अभ्यासात 3500 लोकांचे न धुतलेले मोजे आणि टी-शर्टचा वापर केला होता. त्यात हे श्वान कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णालाही शोधू शकले.

    या व्यतिरिक्त, गेल्या वर्षाच्या अखेरीस ब्रिटनमध्ये सापडलेली प्रकरणे शोधण्यात श्वान यशस्वी झाले होते. या अभ्यासात काम करणारे इरहम विश्वविद्यालयाच्या जैवविज्ञान विभागाचे प्राध्यापक स्टीव लिंडसे यांच्या म्हणण्यानुसार श्वान कोरोना संक्रमित रुग्ण शोधून ब्रिटनमध्ये कोरोना संक्रमण होण्यापासून रोखू शकतात. तर या अभ्यासाचे नेतृत्व करणारे लंडन स्कूल ऑफ हायजीन अॅण्ड ट्रॉपिकल मेडीसीन रोग नियंत्रण विशेष तज्ज्ञ जेम्स लोग सांगतात की, चाचणी करण्याच्या इतर पद्धतींपेक्षा स्पॉट श्वानांद्वारे चाचणी केलेली अधिक चांगली आहे. श्वान ही चाचणी मोठ्या संख्येत आणि अचूक आणि जलद करू शकतात.