burkha wearing girl

कोरोनाबाधित(Corona Positive Patient Travel) असूनही एका तरुणाने आपल्या बायकोचा बुरखा(Man Used Veil For Hiding) परिधान करून विमान प्रवास केला आहे. मात्र त्याच्या एक चुकीमुळे त्याचं पितळ उघडं पडलं आहे.

    जकार्ता : एका कोरोनाबाधित तरुणानं (Corona positive man) तातडीनं घरी पोहोचण्यासाठी अनेकांचा जीव टांगणीला लावल्याची घटना समोर आली आहे. आरोपी तरुण कोरोनाबाधित असूनही त्यानं आपल्या बायकोचा बुरखा परिधान (Travel By Using Wife`s Veil) करून विमान प्रवास केला आहे. मात्र त्याच्या एक चुकीमुळे त्याचं पितळ उघडं पडलं आहे. संबंधित कोरोनाबाधित तरुण बुरखा घालून विमानतळावर पोहोचला पण शेवटी एका चुकीमुळे त्याचं बिंग फुटलं आहे. विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कोरोना चाचणी केली आणि त्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.

    संबंधित तरुणाचं नाव DW असून तो इंडोनेशियाची राजधानी जकार्ताचा रहिवासी आहे. दरम्यान त्यानं कोरोना नियमांचं उल्लंघन करत विमान प्रवास केला आहे. यासाठी त्याने शेकडो लोकांचा जीव धोक्यात घातला होता. आरोपी बुरखा परिधान करुन आपल्या बायकोचा कोरोना निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट घेऊन जकार्ता विमानतळावर गेला. विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांना गंडवण्यात त्याला यशही आलं पण विमानात बसल्यानंतर त्यानं एक चूक की ज्यामुळे त्याचा हा बनाव उघडकीस आला आहे.

    जकार्ता विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना चुकवून विमानात बसल्यानंतर, आरोपी तरुण काही वेळानं टॉयलेटमध्ये गेला. याठिकाणी त्यानं बुरखा उतरवून, पुरुषाचे कपडे परिधान केले आणि आपल्या सीटवर जाऊन बसला. पण ही बाब विमानातील एका महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. तिने या घटनेची माहिती वैमानिकांना दिली. वैमानिकांनी या घटनेबाबत टरनेट विमानतळावरील अधिकाऱ्यांना सतर्क केलं.

    विमान जसं टरनेट विमानतळावर पोहोचलं, तेव्हा विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी DW ला ताब्यात घेतलं. अधिकाऱ्यांनी विमानतळावरच आरोपीची कोरोना चाचणी केली. या चाचणीतही आरोपी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. संबंधित आरोपी कोरोनाबाधित आढळल्यानं अधिकाऱ्यांनी आरोपीला त्याच्या घरीच विलगीकरणात ठेवलं आहे.