Corona spread from Wuhan Lab in China? What exactly happened a year and a half ago? The answer will be found

संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घालून आता दीड वर्ष पूर्ण झाली आहेत. पण या विषाणूच्या उत्पत्तीबाबत अद्यापही सर्वांच्या मनात प्रश्न घर करून आहे. या व्हायरसबाबत एक गुप्त अहवाल याचदरम्यान समोर आल्यामुळे पुन्हा एकदा चीनकडे जगाच्या नजरा वळल्या आहेत.

    वॉशिंग्टन : संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घालून आता दीड वर्ष पूर्ण झाली आहेत. पण या विषाणूच्या उत्पत्तीबाबत अद्यापही सर्वांच्या मनात प्रश्न घर करून आहे. या व्हायरसबाबत एक गुप्त अहवाल याचदरम्यान समोर आल्यामुळे पुन्हा एकदा चीनकडे जगाच्या नजरा वळल्या आहेत.

    कोरोनाचा संसर्ग होण्याच्या एक महिना आधी चीनच्या वुहान लॅबमधील तीन संशोधक आजारी पडले असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात अमेरिकेतील एका वृत्तपत्रानुसार, नोव्हेंबर 2019 मध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीचे तीन संशोधक आजारी पडले होते आणि ते रुग्णालयात दाखल झाले होते. या वृत्तात वुहान लॅबमधील आजारी संशोधकांची संख्या, त्यांची आजारी पडण्याची वेळ आणि रुग्णालयात दाखल होण्याची संपूर्ण माहिती आहे.

    या वृत्तामुळे वुहान लॅबमधून कोरोना पसरल्याची शक्यता असल्याच्या दाव्याच्या तपासासाठी बळ मिळेल, अशी आशा आहे. हे वृत्त जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीच्या एक दिवस आधी आले आहे. कोरोनाच्या उगमाबाबत पुढील टप्प्याच्या तपासावर या बैठकीत चर्चा होण्याचा अंदाज आहे.