आली कोरोनावरील लस आली! पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये होणार उपलब्ध

आली कोरोनावरील लस आली... संपूर्ण जगाला वेठीस धरून ठेवणाऱ्या कोरोनाच्या महामारीवरील लस आता उपलब्ध होणार आहे. जी बातमी ऐकण्यासाठी कान मागील एक वर्षापासून आसुसलेले होते ती दिलासादायक बातमी आली आहे. ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यात कोरोनावरील लस उपलब्ध होणार आहे

आली कोरोनावरील लस आली… संपूर्ण जगाला वेठीस धरून ठेवणाऱ्या कोरोनाच्या महामारीवरील लस आता उपलब्ध होणार आहे. जी बातमी ऐकण्यासाठी कान मागील एक वर्षापासून आसुसलेले होते ती दिलासादायक बातमी आली आहे. ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यात कोरोनावरील लस उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना हिरे लस दिली जाणार आहे.तसेच कोरोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे.

 

फायजरने तयार केलेल्या कोरोनावरील लसीचा वापर सर्वसामान्यांवर व्यापक प्रमाणात करण्याची परवानगी ब्रिटनमध्ये देण्यात आली आहे.फायजर N बायोटेकने विकसित केलेली लस ९५ टक्के संरक्षण देते त्यामुळे ही लस व्यापक वापरासाठी योग्य असल्याचं ब्रिटिश नियामक MHRA ने म्हटलं आहे. ज्या लोकांना सर्वाधिक गरज आहे त्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येईल असं सांगण्यात आले आहे.ब्रिटन सरकारनं यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारक या सर्व मानकांमध्ये लस योग्य ठरली असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लसीच्या व्यापक वापराला परवानगी देणारा युके हा पहिला देश ठरला आहे.