कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेनं चीनला धरलं धारेवर, व्हायरसची उत्पत्ती नेमकी कुठून झाली ? एजन्सीला चौकशी करण्याचे दिले आदेश

बायडेन यांनी एजन्सीला चीनमधील वुहान या शहरातून व्हायरसचा प्रसार झाला असल्याची शंका उपस्थित केली असून वुहान शहरात देखील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या विषाणूची उत्पत्ती प्राणी अथवा प्रयोग शाळेतून झाली का ? याची चौकशी देखील करण्यास सांगितले आहे. 

  संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. भारतासह अमेरिकेमध्ये या विषाणूने धूमाकूळ घातला आहे. त्यामुळे या व्हायरसची उत्पत्ती नेमकी कुठून झाली, याचा शोध आता अमेरिका घेण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी त्यांच्या एजन्सीला या व्हायरसबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या गोष्टीची माहिती आणि अहवाल ९० दिवसांच्या आत मिळावी, असं त्यांनी अमेरिकेच्या एजन्सीला सांगितलं आहे.

  बायडेन यांनी एजन्सीला चीनमधील वुहान या शहरातून व्हायरसचा प्रसार झाला असल्याची शंका उपस्थित केली असून वुहान शहरात देखील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या विषाणूची उत्पत्ती प्राणी अथवा प्रयोग शाळेतून झाली का ? याची चौकशी देखील करण्यास सांगितले आहे.

  आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सहकार्याचं आवाहन

  बायडेन यांनी चौकशीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळेला सुद्धा मदत करण्याची सूचना त्यांनी दिली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सहकार्याचं आवाहन बायडेन यांनी केलं आहे. त्यांनी सांगितलं की, जो देश कोरोना विषाणूची उत्तम प्रकारे सखोल चौकशी करत असेल, अशाचं देशांसोबत अमेरिकेचं सहकार्य असणार आहे. यामुळे चीनवर पारदर्शी आणि आंतरराष्ट्रीय चौकशीत सहभाग घेण्यासोबतच त्यांच्यावर दबाव टाकण्यात सहज मदत होईल.

  बायडेन यांचं विधान अशा वेळेस समोर आलं आहे, जेव्हा अमेरिकेचे संक्रमण रोग तज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांनी जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनाची उत्पत्ती आणि प्रसार कुठून व कसा झाला, याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  चीनवर दबाव वाढणार 

  अमेरिका कोरोना व्हायरसवर मोठ्या प्रमाणात आणि वेगानं चौकशी करत आहे. कोरोना व्हायरसचे टास्क फोर्सचे चीफ डॉ. अँथनी फॉसी यांनी काही दिवसांपूर्वी इशारा देत सांगितलं की, कोरोना व्हायरची सुरूवात आणि उत्पत्ती याबाबत सखोल चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच ऑस्ट्रेलियन सरकारच्या एका मंत्र्याने सुद्धा अशाचं प्रकारचं विधान केलं होतं.