चिंताजनक! जपानमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन; टोकियोत लॉकडाऊन जाहीर

जपानच्या आरोग्य मंत्रालयानं रविवारी दिलेल्या माहितीनुसार, हवाई मार्गावर चाचणीदरम्यान एकूण चार लोकांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. ज्यात जवळपास एक ४० वर्षीय पुरूष, ३० वर्षीय महिला आणि दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे.

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचे नवीन स्ट्रेन पाहायला मिळाले. त्यानंतर भारतात सुद्धा त्याचे काही पडसाद उमटले. परंतु आता चिंताजनक म्हणजे जपानमध्ये सुद्धा कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानं पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे टोकियोत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

जपानच्या आरोग्य मंत्रालयानं रविवारी दिलेल्या माहितीनुसार, हवाई मार्गावर चाचणीदरम्यान एकूण चार लोकांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. ज्यात जवळपास एक ४० वर्षीय पुरूष, ३० वर्षीय महिला आणि दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. हवाई मार्गावर पुरूषामध्ये कोणतेही संक्रमणाची लक्षणं आढळली नाहीत. पण त्यानंतर श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. जास्त त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तर दुसरीकडे कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं संक्रमित असलेल्या महिलेला डोकेदुखी आणि तापाची समस्या उद्भवली होती. लहान मुलांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या प्रसारामुळे शुक्रवारी टोकियो आणि आसपासच्या क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. याअंतर्गत रेस्टॉरंट आणि बार रात्री आठनंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.