sex

ऑनलाईन क्लास(Online Class) सुरू असताना कपलने सेक्स(Sex) करण्यास सुरुवात केली. ऑनलाईन क्लासदरम्यान लॅपटॉपचा कॅमेरा सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही.

    कोरोनामुळे(Corona) संपूर्ण जगात उलथापालथ झाली. कधीही न घडलेल्या अनेक घटना कोरोना काळात झाल्या. मोठ-मोठी शहरं, मॉल, थिएटर एवढंच काय तर शाळा, कॉलेजदेखील कोरोनामुळे बंद झाले. अनेक कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली. शाळा बंद असल्याने मुलांचेही ऑनलाईन वर्ग, क्लास सुरू झाले. ऑनलाईन क्लासेस(Online Classes) हा प्रकार तसा नवीनच असल्याने अनेक विचित्र गोष्टीही दिसल्या. असाच ऑनलाईन क्लास सुरू असताना एका कपलने केलेल्या कृत्याचा(Couple Sex While Online class was On) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    ऑनलाईन क्लास(Online Class) सुरू असताना कपलने सेक्स(Sex) करण्यास सुरुवात केली. ऑनलाईन क्लासदरम्यान लॅपटॉपचा कॅमेरा सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. ऑनलाईन क्लास घेत असलेल्या शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला.मात्र ते दोघे थांबतच नव्हते. अखेर ऑनलाईन क्लास घेणारे शिक्षक मोठ्याने ओरडले, संतापले. कपलने त्यांचा आवाज ऐकल्यानंतर त्यांना कॅमेरा सुरू असल्याचं समजलं.व्हिएतनाममधील मिन्ह शहरांत हा प्रकार घडला.

    ऑनलाईन क्लासमध्ये कॅमेरा सुरू राहिल्याने हा संपूर्ण प्रकार लीक झाला. या कपलला आपली चूक समजल्यानंतर त्यांनी लगेचच माफी मागितली. या प्रकारानंतर  त्या महाविद्यालयाने नियम कठोर केले आहेत. ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थ्यांना नियम-अटी पाळण्याच्या कठोर सूचनाही देण्यात आल्या आहेत.

    दरम्यान, याआधीही असे प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे अनेक कामं घरुनच होऊ लागली. न्यायालयातील सुनावणीदेखील ऑनलाईन होत होती. अशाच प्रकारे कॅमेरा सुरू राहिल्याने एक वकील सुनावणीवेळीच आपल्या पार्टनरसोबत सेक्स करत असल्याचं दिसलं होतं. हा प्रकार ऑनलाईन दिसत असल्याने त्यांना याबाबत सांगितलं जात होतं. पण काही ऐकू येत नसल्याने कॅमेरा सुरूच असल्याचं त्यांना समजलं नाही. मात्र काही वेळात ही बाब कपलच्या लक्षात आल्यानंतर त्या वकीलाने सर्वांची माफी मागितली होती.