सेक्स करताना जोडप्यांचा आरडा आरोडा; शेजारी वैतागले अन्…

एकमेकांसोबत घालवलेले खाजगी क्षण हे प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात. चार भिंतीच्या आत कपल्स या खाजगी क्षणांचा आनंद लुटतात. मात्र, त्याचा त्रास शेजाऱ्यांना होत असल्याचा प्रकार स्कॉटलंडमधील ग्लासगोमध्ये घडला आहे.

    स्कॉटलंड : एकमेकांसोबत घालवलेले खाजगी क्षण हे प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात. चार भिंतीच्या आत कपल्स या खाजगी क्षणांचा आनंद लुटतात. मात्र, त्याचा त्रास शेजाऱ्यांना होत असल्याचा प्रकार स्कॉटलंडमधील ग्लासगोमध्ये घडला आहे.

    भिंतिलाही कान असतात अशी म्हण आहे. मात्र, ही म्हण खरी असते याची प्रचिती आणणारा असाच हा काहीसा प्रकार आहे. रात्रीच्या वेळेस आपल्या खोलीत सेक्स करणाऱ्या जोडप्यांचा आवाज एकून शेजारी वैतागले. यामुळे या जोडप्याचे शेजाऱ्याने त्यांना एक चिठ्ठी पाठवली. शेजाऱ्याने लिहिलेल्या या चिठ्ठीमुळे जोडपं लाजलं आहे.

    या चिठ्ठीतील मजकुरही अतिशय रंजक आहे. घरांच्या भिंती एकमेकांना लागून आहेत. यामुळे तुम्ही रात्री जे काही करता त्याचा सगळा आवाज आम्हाला एकू येतो. तुमचे उत्कट क्षण हे खासगी आहेत, त्यात आम्हाला सामील करून घेऊ नका. रात्रीच्यावेळी तुमचा आवाज कमी ठेवा असा सल्लाही या शेजाऱ्याने या पत्राद्वारे दिला आहे.

    विशेष म्हणजे या शेजाऱ्यांनी रात्री या जोडप्याचा आरडा ओरडा सुरु असताना त्यांचे दार वाजवले. यानंतर ही चिठ्ठी त्यांच्या दारात ढकलली. मध्यरात्री दरवाजा वाजवून शेजाऱ्यांनी दिलेली ही चिठ्ठी वाचून त्यांना लाजीरवाणे वाटले.