बापरे! या देशात ‘पक्ष्यांना’ नव्हे ‘नागरिकांना’ झालीय बर्ड फ्ल्यूची लागण

रशियाच्या आरोग्य यंत्रणांनी मोठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून एच५एन८ ने पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु केला आहेत. या आधी कधीच बर्ड फ्ल्यूची लागण माणसाला झालेली नव्हती. हा पहिला प्रकार समोर आल्याने जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

    कोरोनानंतर पसरलेल्या बर्ड फ्ल्यूने आता उडवण्यास सुरुवात झोप उडविण्यास सुरुवात केली आहे. घातक असलेल्या व आतापर्यंत पक्ष्यांमध्येच लागण असलेल्या बर्ड फ्ल्यूच्या घातक एच५एन८ विषाणूने माणसांमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. रशियात या विषाणूने बाधित सात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.रशियाच्या आरोग्य यंत्रणांनी मोठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून एच५एन८ ने पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु केला आहेत. या आधी कधीच बर्ड फ्ल्यूची लागण माणसाला झालेली नव्हती. हा पहिला प्रकार समोर आल्याने जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. व्हेक्टर रिसर्च सेंटरचे वैज्ञानिक अन्ना पॉपोवा यांनी रशियन मीडियाला याची माहिती दिली आहे. रशियामध्ये एव्हिअन इन्फ्यूएन्झा ए व्हायरसच्या एच५एन८ स्ट्रेनने माणसाला संक्रमित केले आहे. अशा प्रकारची ही पहिलीच वेळ आहे. हे सातही रुग्ण रशियातील एका पोल्ट्री फार्मचे कर्मचारी आहेत. वैज्ञानिकांनी या सातही जणांना आयसोलेट केले आहे. या भागात डिसेंबर २०२० मध्ये बर्ड फ्ल्यूचा उद्रेक पहायला मिळाला होता.पॉपोवा यांनी सांगितले की, सर्व सात लोक आता स्वस्थ आहेत. त्यांच्या शरिरात एच५एन८ स्ट्रेनच्या संक्रमणाचे खूपच हलकी लक्षणे दिसत आहेत. तरीही सावधगिरी म्हणून त्यांना आयसोलेट केले आहे. या बाधितांवर वैज्ञानिक सतत लक्ष ठेवून आहेत.