ओएमजी! पायलटने रिस्क घेत मारलाय शॉकिंग सूर ; Video पाहून भरेल कापरं

कोस्टाने तुर्कीच्या इस्तंबूलमधील दोन बोगद्यांच्या मधून जिवको एज 540 रेसिंग विमान उडविले. हा जीवघेणा स्टंट करताना अचूक कौशल्य आणि धाडसाची आवश्यकता होती. कैटाल्का मेवकीच्या उत्तरेकडील मरमारा हायवेवर हे दोन सुरुंग आहेत.

  दोन बोगद्यांमधून 150 मैल प्रति तासहून अधिक वेगाने विमान उडवून एका पायलटने इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असं शॉकिंग काम केलं आहे. पायलटच्या या श्वास रोखणाऱ्या कारनाम्याने पाच नवीन जागतिक रेकॉर्ड झाले आहेत. आजवर कोणीही दोन सुरुंगांच्या मधून एवढ्या प्रचंड वेगाने विमान उडविलेले नाहीय. हा कारनामा इटलीचा स्टंट पायलट डारियो कोस्टाने (Dario Costa) याच्या नावावर नोंदविला गेला आहे.

  कोस्टाने तुर्कीच्या इस्तंबूलमधील दोन बोगद्यांच्या मधून जिवको एज 540 रेसिंग विमान उडविले. हा जीवघेणा स्टंट करताना अचूक कौशल्य आणि धाडसाची आवश्यकता होती. कैटाल्का मेवकीच्या उत्तरेकडील मरमारा हायवेवर हे दोन सुरुंग आहेत. डारियो कोस्टाने एका बोगद्यातून विमान उडविण्यास सुरुवात केली, दुसऱ्या मोठ्या बोगद्यातून ते उडवत बोगदा संपल्यावर हवेत उंच नेत परत खाली वळविले.

  पाहा व्हिडिओ :

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Red Bull (@redbull)

  धक्कादायक गोष्ट अशी की, त्यावेळी वाऱ्याची दिशा त्याच्या उलट होती. यामुळे विमान हवेत हेलकावे घेण्याची शक्यता अधिक होती. तरीदेखील त्याने रिस्क घेतली आणि 360-मीटरच्या पहिल्या सुरुंगातून विमान पळविले. नंतर 1160 मीटर लांबीच्या सुरुंगातून ते विमान जमिनीला समांतर ठेवत वेगाने उडविले. हा स्टंट पूर्ण करण्यासाठी कोस्टाला 43.44 सेकंदांचा कालावधी लागला. स्टंट पूर्ण होताच कोस्टाने हवेत वर जात 360 डिग्रीचा लूप घेत आनंद साजरा केला.

  पाहा व्हिडिओ :

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Red Bull (@redbull)

  असे आहेत पाच रेकॉर्ड