कडाक्याच्या थंडीत चिनी जवानाचा मृत्यू ; लडाखमध्ये ड्रॅगनला झटका

बीजिंग : प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैन्यावर निसर्गामुळे आफत ओढवली आहे. पॅन्गाँग सरोवराजवळ घुसखोरी करणाऱ्या चिनी सैन्याच्या जवानाचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला (Death of Chinese soldier in extreme cold)असल्याचे उघडकीस आले.

बीजिंग : प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैन्यावर निसर्गामुळे आफत ओढवली आहे. पॅन्गाँग सरोवराजवळ घुसखोरी करणाऱ्या चिनी सैन्याच्या जवानाचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला (Death of Chinese soldier in extreme cold)असल्याचे उघडकीस आले. पँगाँगमध्ये रात्रीच्या वेळेस कडाक्याची थंडी असते. गेल्याच आठवड्यात एका चिनी सैनिकाला येथून घेऊन जाताना दिसून आले आहोते. चिनी सैनिकांना येथील थंडी सहन होत नसल्याचेही दिसून आले असून आता चिनी सैनिकांच्या या संख्येत वाढ झाल्याचेही दिसून आले आहे. या भागात अजूनही थंडी सुरू झाली नाही. तर, दुसरीकडे भारतीय जवानांना कडाक्याच्या थंडीत काम करण्याचा अनुभव आहे.

चीनचे सर्व दावे फोल
पँगाँग सरोवराजवळील १५ हजार ते १६ हजार फूट उंच पर्वतावर जवळपास पाच हजार चिनी सैन्य तैनात आहे. थंडीपासून बचाव व्हावा यासाठी चीनने अत्याधुनिक बॅरेक उभारले असल्याचा दावा केला होता. एवढेच नव्हे तर या बॅरकमधील वातावरण गरम राहणार असल्याचे तसेच येथे चिनी सैनिक आंघोळही करू शकतील असेही म्हटले होते. यासोबतच चिनी माध्यमांनी पीपुल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) लडाखनजीक तिबेटच्या नागरी परिसरात मोठ्या प्रमाणात तोफाही तैनात केल्या असल्याचा दावा केला होता.परंतु येथील कडाक्याच्या थंडीमुळे चीनचे सर्व दावे फोल ठरले आहेत.

पीएलएची युद्ध सज्जता

चिनी माध्यमांनी पीएलए युद्धाची सज्जताही करीत असल्याचे म्हटले होते. जुन्या आणि अस्थायी बॅरकऐवजी सैनिकांसाठी नवे तसेच स्थायी बॅरकचीही उभारणी केली जात असल्याचा दावा करण्यात आला होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सैन्य सुविधांची निर्मितीही करण्यात येत असल्याचा दाव्यात म्हटले होते. पीएलएने ही नव्या बॅरकचे चित्र जारी केले होते यात उत्तुंग इमारतीही दिसत होत्या. शिवाय तोफा लपविण्याचीही या बॅरकमध्ये सोय करण्यात आली होती. ही सर्व तयारी युद्धाची सज्जताच असल्याचा दावा करण्यात आला होता.