deer

अमेरिकेच्या टेनेसीमध्ये एक अजब प्रकार पाहायला मिळाला आहे. एका हरणाच्या (Deer) डोळ्यात केस उगवले ( deer with hair growing in Eyeballs) आहेत. या हरणाच्या डोळ्यात उगवणारे केस पाहिल्यावर पशुवैद्यकीय डॉक्टरांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.

    टेनेसी : अमेरिकेच्या टेनेसीमध्ये एक अजब प्रकार पाहायला मिळाला आहे. एका हरणाच्या (Deer) डोळ्यात केस उगवले ( deer with hair growing in Eyeballs) आहेत. या हरणाच्या डोळ्यात उगवणारे केस पाहिल्यावर पशुवैद्यकीय डॉक्टरांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.

    या हरणाच्या दोन्ही डोळ्यांमधील बुब्बुळांवर केस उगवले आहेत. त्यामुळे या हरणाला पुढचं काही दिसत नाही. या हरणाच्या डोळ्यामध्ये केस उगवल्याबाबतची माहिती नॅशनल डियर असोसिएशनच्या क्वॉलिटी व्हाइटटेल्स मॅगझिनमध्ये प्रकाशित झाली आहे.

    deer with a hair in the eye

    आता या हरणाच्या डोळ्यात केस उगवण्याच कारण आहे एक गंभीर आजार. या हरणाच्या शरीराची अनेक प्रकारे तपासणी करण्यात आली. त्यातून हे समजलं की हरणाला एपिजुओटिक हेमोरॅजिक डिजीज (EHD) झाला आहे. त्यामुळे हरणाला ताप येत आहे. त्याच्या शरीरातील पेशी फुगत होत्या. या आजाराला वन्यजीव तज्ज्ञ डरमॉयड (Dermoid) असं म्हणतात. मिळालेल्या माहितीनुसार हे एका बेनिन ट्युमरमुळे (Benign Tumor) झालं आहे. साधारणत: हा ट्युमर शरीराच्या इतर अवयवांमध्ये सापडतो. मात्र हरणाच्या डोळ्यांमध्ये हा ट्युमर आहे. या हरणाच्या डोळ्यांमध्ये स्किन टिश्यू तयार होऊन बुब्बुळांवर केस उगवले आहेत.

    बायोलॉजिस्ट स्टर्लिंग डॅनियल्स यांनी सांगितले की, या हरणाला दिवस आहे की रात्र आहे हे समजतं. पण तो कुठे जातोय हे कळत नाही. तसेच हा आजार झालेल्या हरणांना माणसांची भीती कमी असते. त्यामुळेच ते माणसांवर हल्लादेखील करू शकतं. सध्या या हरणावर काही उपचार करता येतील का याचा शोध घेतला जात आहे.