rajnath singh

भारत आपल्या सुरक्षेमध्ये तडजोड करणार नाही आणि गरज पडल्यास त्यांच्या भूमीवर जाऊन आम्ही दहशतवांद्यांचा खात्मा करू. असं म्हणत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. तामिळनाडूमधील वेलिंग्टण डिफेंस सर्व्हिस स्टाफ महाविद्यालयात राजनाथ सिंह यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी ते बोलत होते.

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी पाकिस्तानचा नामोेल्लेख न करता खरमरीत टोला लगावला आहे. एक देश दहशतवाद्यांकडून पाठिंबा मिळवत आहे. भारत आपल्या सुरक्षेमध्ये तडजोड करणार नाही आणि गरज पडल्यास त्यांच्या भूमीवर जाऊन आम्ही दहशतवांद्यांचा खात्मा करू. असं म्हणत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. तामिळनाडूमधील वेलिंग्टण डिफेंस सर्व्हिस स्टाफ महाविद्यालयात राजनाथ सिंह यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी ते बोलत होते.

    राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिलं आव्हान

    आमच्या सामर्थ्यामुळे युद्धबंदीचे पालन केले जात आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंद झालं आहे. ते फक्त आमच्या सामर्थ्यामुळे झालं आहे. २०१६ ला पाकिस्तानमधून क्रॉस-बॉर्डर स्ट्राईक्समुळे आमची वृत्ती प्रतिक्रिया ऐवजी आक्रमक झाली.२०१९ मध्ये बालाकोटमधून पाकिस्तानला उत्तर देण्यात आलं आहे. असं राजनाथ सिंह म्हणाले.

    पुढे म्हणाले की, भारत आपल्या भूमीवर दहशतवादयांचा खात्मा करेलच. परंतु दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची गरज लागली तर तिही आम्ही करू शकतो. असं सिंह म्हणाले.

    अफगाणमधील अवस्था आव्हानात्मक

    अफगाणमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील अवस्था सध्या आव्हानात्मक आहे. या परिस्थितीवर पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडले आहे. आम्ही धोरण बदलणार आहोत आणि क्वॉडचं धोरण ठरवलं जाईल.