ऐन जन्माष्टमीच्या दिवशी पाकमध्ये समाजकंटकांकडून कृष्ण मंदिराची तोडफोड; भाविकांवरही हल्ला

ऐन जन्माष्टमीच्या दिवशी (सोमवारी ) काही समाजकंटकांनी श्रीकृष्णाची मूर्ती तोडली. ही घटना मंदिरात जन्माष्टमी सोहळ्यादरम्यान घडली. या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे. परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र आतापर्यं कुठल्याही आरोपीला अटक झालेली नाही.

    कराची: पाकिस्तानमध्ये कट्टरवाद्यांची हिंदूविरोधात कारवाया सुरूच आहेत. पाकिस्तानात आज पुन्हा हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पाकमधील सिद्धिविनायक मंदिराच्या तोडफोडीनंतर आता सिंध प्रांतातील संघर जिल्ह्यातील खिप्रोमध्ये समाजकंटकांनी कृष्ण जन्माष्टमी दिवशीच कृष्ण मंदिरांची मोडतोड केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

    ऐन जन्माष्टमीच्या दिवशी (सोमवारी ) काही समाजकंटकांनी श्रीकृष्णाची मूर्ती तोडली. ही घटना मंदिरात जन्माष्टमी सोहळ्यादरम्यान घडली. या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे. परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र आतापर्यं कुठल्याही आरोपीला अटक झालेली नाही.

    पाकिस्तानी अॅक्टिव्हिस्ट वकील ऑस्टिन यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, मंदिरात जन्माष्टमीची पूजा सुरू असतानाच हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये भाविकांना मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे.