कोरोना संपवण्यासाठी ‘या’ पक्ष्यांचा व प्राण्यांचा नायनाट करा ; उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उनने यांचा क्रूर आदेश

सीमेवरील शहरांत आणि गावांत अधिकारी लोक पक्ष्यांना मारताना आणि मांजरी तसेच त्यांच्या मालकांना शोधताना दिसून आले आहेत. कोरियातील अधिकारी स्थानिक लोकांवर प्राण्यांना मारण्यासाठीही दबाव टाकत आहेत.

    कायम आपल्या बाष्कळ दावे आणि अजब आदेश काढण्यासाठी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उनने प्रसिद्ध आहेत. नुकतचं किम यांनी

    कोरोनाचा संसर्ग कमी करून तो नष्ट करण्यासाठी 'सर्व कबुतरं आणि मांजरांना नष्ट करण्याचा क्रूर आदेश दिला आहे. कारण कबूतरं आणि मांजरं चीनच्या सीमेच्या माध्यमाने कोरोना व्हायरस पसरवतात' .

    उत्तर कोरियाता वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हुकूमशहा जोंग उन यांनी विविध उपाय योजना राबवल्या आहेत. त्यामध्ये कोविडला आळा घालण्याच्या उपायांत, एक आदेश, भटक्या मांजरांना मारणे आणि चीनच्या सीमेतून देशात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही पक्षाला गोळी घालणे, असाही आहे. नुकतेच सीमेजवळील हेसन येथे एका कुटुंबाला शिक्षा देण्यात आली होती. आपल्या घरात मांजर पाळण्यासाठी त्यांना २० दिवस आयसोलेशन केंद्रात ठेवण्यात आले होते. सीमेवरील शहरांत आणि गावांत अधिकारी लोक पक्ष्यांना मारताना आणि मांजरी तसेच त्यांच्या मालकांना शोधताना दिसून आले आहेत. कोरियातील अधिकारी स्थानिक लोकांवर प्राण्यांना मारण्यासाठीही दबाव टाकत आहेत.

    हुकूमशहा जोंग उन यांचा अंदाज आहे, की हे प्राणी आणि पक्षी चीनला लागून असलेल्या सीमेवरून धोकादायक व्हायरस आणत आहेत. यापूर्वी एक असेही वृत्त आले होते, की उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने एका अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर देशातील सर्व प्रमुख रुग्णालयांत चिनी औषधांच्या वापरावर बंदी घातली होती.