‘हा’ व्यापारी महिलांचे घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त मोजे करतो खरेदी , हजारो रुपये करतो खर्च; कारण जाणून बसेल धक्का!

युनायटेड किंगडममधील हल (Hull) शहरात राहणारी ही व्यक्ती अशा प्रकारचे मोजे खरेदी करतो. तो विशेषत: मुलींचे घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त मोजे खरेदी करतो. या व्यक्तीने आपलं नाव मिस्टर डी असं सांगितलं. तथापि, त्याने आपली खरी ओळख जाहीर केली नाही.

  घाणेरड्या आणि दुर्गंधीयुक्त मोजांच्या वास कोणाला आवडतो का? प्रत्येकजण अशा लोकापांसून दूर राहण्याचा प्रयत्न करतो ज्यांच्या मोजांचा घाणेरडा वास येतो. पण ही व्यक्ती एक व्यावसायिक आहे. त्याला मोजांचा घाणेरडा आणि दुर्गंधीयुक्त वास आवडतो. तो अशा मोजांच्या प्रचंड प्रेमात आहे की, यासाठी दर महिन्याला हजारो रुपये खर्च करतो. बातमी अशी आहे की, युकेतील एक व्यावसायिक, असे मोजे खरेदी करतो जे घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त असतात.

  तो असं का करतो?

  वृत्तानुसार, युनायटेड किंगडममधील हल (Hull) शहरात राहणारी ही व्यक्ती अशा प्रकारचे मोजे खरेदी करतो. तो विशेषत: मुलींचे घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त मोजे खरेदी करतो. या व्यक्तीने आपलं नाव मिस्टर डी असं सांगितलं. तथापि, त्याने आपली खरी ओळख जाहीर केली नाही. तो म्हणतो की, त्याला मुलींचे घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त मोजे आकर्षित करतात.

  दर महिन्याला एवढे रुपये खर्च करतो

  या व्यक्तीने कबूल केलं आहे की, तो दर महिन्याला २०० युरो या कामासाठी खर्च करतो. म्हणजेच जवळपास १७,३३८ रुपये तो मुलींचे घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त मोजे खरेदी करण्यासाठी खर्च करतो. त्याने असंही म्हटलं की, त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे ठीक नाही आणि तो ही सामान्य माणूसच आहे पण त्याचा छंद हा आहे की, त्याला दुर्गंधीयुक्त मोजे आवडतात.

  या मोज्यांचं तो करतो काय?

  मिस्टर डी ने सांगितलं की, तो मुलींच्या मोज्यांचा वास घेतो. एवढंच नाही, जर हा वास त्याला अत्याधिक आवडला तर, अनेकदा तो मोजे टेस्ट करण्यासाठी मोजे तोंडातही घालतो. घाणेरड्या मोजांची किंमत तो महिलेनुसार ठरवतो. जसे की, जर एखाद्या सेलिब्रिटी महिलेचा मोजे असतील, तर तिला अधिक पैसे मिळतात. प्रयत्न हाच असतो की, २१ ते ३८ वयाच्या दरम्यानच्या महिलांचे मोजे तो खरेदी करतो.