विकृत चीनची ‘त्या’ फोटोमुळे जगभर नाचक्की ! भारतातील पेटत्या चितांवरून खिल्ली उडवणे पडले महागात

चीनची मायक्रो ब्लॉगिंग साईट वीबोवर कम्‍युनिस्‍ट पार्टीच्या सेंट्रल पोलिटिकल अँड लीगल अफेअरचे अकाऊंट आहे. यावर हे वादग्रस्त विधान फोटोंसह पोस्ट करण्यात आले होते. यानंतर सोशल मीडियावर कम्युनिस्ट पक्षाला त्यांच्याच लोकांनी घेरले. एका फोटोत चीन रॉकेट लाँच करत असताना दाखविले होते, तर दुसऱ्या फोटोत भारतातील स्मशानभूमीतील पेटत्या चिता दाखविण्यात आल्या होत्या. या फोटोचे कॅप्शन 'चीनमध्ये आग जळणे विरुद्ध भारतात आग जळणे' असे होते.

    बिजिंग : भारतात कोरोनाचा उद्रेक झाला असून येथील आरोग्य व्यवस्था पूर्ण कोडमडली आहे. अशातच या संकटात मदतीचा हात पुढे करून चीन जगासमोर सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र याबाबत चीनचे कौतुक नाही तर जगभर खिल्ली उडविण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या स्मशानभूमीत जळणाऱ्या सरणावरून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पक्षाने भारताची खिल्ली उडविली. चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरून भारतातील कोरोना संकटाची खिल्ली उडविण्यात आली. भारतात चिता जळत आहेत आणि चीन अंतराळात स्पेस स्टेशन तयार करत आहे, असे लिहिण्यात आले होते. यामुळे चीनचा पुन्हा एकदा विकृत चेहरा समोर आला आहे. मात्र, हा प्रकार त्यांच्याच अंगलट आला आणि जगभरात चीनला नाचक्कीचा सामना करावा लागला.

     

    चीनची मायक्रो ब्लॉगिंग साईट वीबोवर कम्‍युनिस्‍ट पार्टीच्या सेंट्रल पोलिटिकल अँड लीगल अफेअरचे अकाऊंट आहे. यावर हे वादग्रस्त विधान फोटोंसह पोस्ट करण्यात आले होते. यानंतर सोशल मीडियावर कम्युनिस्ट पक्षाला त्यांच्याच लोकांनी घेरले. एका फोटोत चीन रॉकेट लाँच करत असताना दाखविले होते, तर दुसऱ्या फोटोत भारतातील स्मशानभूमीतील पेटत्या चिता दाखविण्यात आल्या होत्या. या फोटोचे कॅप्शन ‘चीनमध्ये आग जळणे विरुद्ध भारतात आग जळणे’ असे होते.

    लोकांनी चीनच्या या पोस्टवर खूप तीव्र प्रतिक्रिया दिल्या आणि कम्युनिस्ट पक्षावार असंवेदनशील असल्याचे आरोप केले. चीनच्या सरकारी वृत्तपत्राचे ग्लोबल टाईम्सचे संपादक हू शिजिन यांनी लिहिले की, आपल्याला आताच्या काळात भारतासाठी मानवतेचा झेंडा हाती घ्यायला हवा. मात्र, यानंतर हू शिजिन यांचा खरा चेहराही समोर आला. चीनला याचे टेन्शन आहे की, जर चीनने ऑक्सिजन कंसट्रेटर्स आणि व्हेंटिलेटरसारख्या वैद्यकीय वस्तू भारताला दिल्या तर भारत त्याचा वापर गरीबांसाठी करायचे सोडून श्रीमंतांना वाचविण्यासाठी करेल, असे ट्विट केले. एकप्रकारे त्य़ांनी भारतीय यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.