Do you want to keep snakes? It was a dangerous experience; He will not take the name of the snake again

शेवटी साप तो सापचं... अशी म्हण आहे. ही म्हण खरी ठरवणारा थरारक अनुभव चीन मधील एका व्यक्तीला आला आहे. साप पाळण्याची हौस या व्यक्तीला चांगलीच भारी पडली आहे. हा व्यक्ती मरता मरता वाचला आहे.

    हेलोनजियांग : शेवटी साप तो सापचं… अशी म्हण आहे. ही म्हण खरी ठरवणारा थरारक अनुभव चीन मधील एका व्यक्तीला आला आहे. साप पाळण्याची हौस या व्यक्तीला चांगलीच भारी पडली आहे. हा व्यक्ती मरता मरता वाचला आहे.

    चीनच्या हेलोनजियांग प्रांतात हा प्रकार घडला आहे. या व्यक्तीचं सापावर इतकं प्रेम होतं की, त्याने साप पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मग काय त्याने विषारी नसलेला किंग कोब्रा साप ऑनलाइन ऑर्डरही केला.

    पण चुकून त्याच्या घरी विषारी किंग कोब्रा सापाची डिलीव्हरी झाली. त्यानंतर त्याला अंगावर शहारे आणणारा थरारक अनुभव आला. एक एक मीटर लांब असा हा बिन विषारी साप त्याने ऑर्डर केला. प्रत्यक्षात मात्र, हा साप विषारी होता याची या व्यक्तीला कल्पनाही नव्हती.

    घरात असलेला साप विषारी नसल्याचं समजून हा व्यक्ती बिनधास्त झोपला होता. तेव्हा अचानक सापाने त्याच्या पायावर दंश मारला. ज्यानंतर या व्यक्तीला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

    उपचार करताना डॉक्टरही हैराण झाले. कारण साप अत्यंत विषारी होता. जर या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी जराही उशीर झाला असता तर हा व्यक्ती बचावला नसता असे डॉक्टरांनी सांगीतले.