अजब – गजब, चीनमध्ये होणार कुत्र्यांचा लिलाव, किंमत किती आहे माहिती आहे का ?

चीनच्या पोलीस अ‍ॅकॅडमीने (China Police Academy) भित्र्या कुत्र्यांना आपल्या टीममधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. अशा चौपन्न कुत्र्यांचा लिलाव(Auction Of Dogs) केला जाणार आहे. 

    बिजींग: चीनमधल्या(China) स्पर्धेची पातळी एवढी वाढली आहे, की केवळ माणसांच्याच नव्हे, तर कुत्र्यांच्या नोकर्‍याही(Job Of Dogs) सुरक्षित राहिलेल्या नाहीत. चीनच्या पोलीस अ‍ॅकॅडमीने (China Police Academy) भित्र्या कुत्र्यांना आपल्या टीममधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. अशा चौपन्न कुत्र्यांचा लिलाव(Auction Of Dogs) केला जाणार आहे.

    पोलीस अ‍ॅकॅडमीच्या आवारामध्ये या कुत्र्यांचा लिलाव होणार आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाऱ्या नागरिकांनाच हे कुत्रे देण्यात येणार आहेत. या कुत्र्यांविषयी पोलीस अ‍ॅकॅडमीने माहिती दिली आहे. हे सर्व कुत्रे लहान, भित्रे, कमकुवत आणि आज्ञा न पाळणारे आहेत. विशेष बाब म्हणजे त्यामधले काही कुत्रे इतके भित्रे आहेत, की त्यांना दुसऱ्यांना चावण्याची आज्ञा दिली, तरी ते चावत नाहीत. या लिलावाच्या वेळी बोली लावणाऱ्या व्यक्तीने सर्व शासकीय नियमांचं पालन करणं आवश्यक असेल. कुत्र्यांची काळजी घेणं, त्यांना पुन्हा न विकणं आणि त्यांना न मारणं अशा नियमांचा त्यात समावेश आहे. या कुत्र्यांची किंमत दोनशे युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे बावीसशे रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

    जर्मन शेफर्ड कुत्रे प्रामुख्याने शांतता, बुद्धिमत्ता, निष्ठा, सामर्थ्य आणि चलाखीसाठी ओळखले जातात. त्यांचं शरीर काटक असतं. यामुळेच त्यांचा पोलीस प्रशिक्षणामध्ये सर्वाधिक वापर केला जातो. तरीही भित्रेपणामुळे हे कुत्रे अपात्र ठरले आहेत. माणसांप्रमाणेच चीनमध्ये कुत्र्यांचीही नोकरी सुरक्षित नसल्याने लोक सोशल मीडियावर खिल्ली उडवत आहेत.

    याविषयी एका युजरनं म्हटलं आहे, की कुत्रेदेखील सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी भयानक स्पर्धा करत आहेत. काहींनी असंही म्हटलं आहे, की कुत्रे भित्रे असल्याने चोरांना पकडू शकणार नाहीत. परंतु मुलं तरी त्यांच्याबरोबर खेळू शकतात. त्याच वेळी काही लोकांनी अशीही खिल्ली उडवली, की खरेदी करणारे लोक कुत्र्यांना घरी घेऊन गेल्यावर ते परीक्षेमध्ये नापास झाले आहेत, असं सांगणार नाहीत.
    चीनमधील लिओनिंग प्रांतात (Liaoning province) एकूण 54 भित्र्या कुत्र्यांचा लिलाव होणार आहे. हे सर्व कुत्रे चीनच्या पोलीस अ‍ॅकॅडमीच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नापास झाले आहेत. त्यांचा लिलाव होण्यामागचं हे प्रमुख कारण आहे. हे कुत्रे पूर्णतः प्रशिक्षित आहेत. यामध्ये जर्मन शेफर्ड आणि बेल्जियम मालिनोइस जातीच्या कुत्र्यांचा समावेश आहे.