चीनच्या युलिन(Yulin) प्रांतात Dog’s meet फेस्टिव्हलला सुरुवात ; यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका अधिक तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

कोरोनाची नव-नवीन प्रकरण वाढत असताना या फेस्टिव्हलला देण्यात आलेली मंजुरी चीनला चांगलीच पडू शकते. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने मोठ्या संख्येने लोक जमा होणार. यामुळे संक्रमणाचा धोका अधिक वाढेल आणि कुत्र्याचे मांस खाऊन हा धोका दुपटीने वाढेल.

    बीजिंग: चीनमुळे जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे आता चीनी लोकांच्या खाण्याच्या सवयीवरही सवाल उपस्थित करण्यात येत आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात वटवाघूळ खाल्ल्याने हा व्हायरस पसरल्याचा अंदाज लावण्यात आला होता. मात्र यानंतरही चीनच्या वृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नसल्याचे समोर आले आहे. चीनच्या युलिन प्रांतात(Yulin) १० दिवसांचा डॉग मीट फेस्टिव्हल (Dog Meat Festival) सुरू झाला आहे. या १० दिवसांत तब्बल ५ हजाराहून अधिक कुत्र्यांची कत्तल केली जाणार असल्याचा अंदाज आहे.

    विविध ठिकाणांहून आणले जातात डॉग्ज

    ‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, आरोग्यासंबंधीच्या धोक्याकडे दुर्लक्ष करून युलिन प्रांतात हा फेस्टिव्हल सुरू करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रांतांतून या ठिकाणी कुत्रे आणले जातात. प्रथा परंपरेच्या प्रथेच्या नावाखाली हलाल केले जाते. या फेस्टिव्हलकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून कुत्र्यांची कत्तल करून आर्कषक पद्धतीनं दुकानांवर लटकवण्यास सुरूवात करण्यात आखली आहे.

    कोरोनाची नव-नवीन प्रकरण वाढत असताना या फेस्टिव्हलला देण्यात आलेली मंजुरी चीनला चांगलीच पडू शकते. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने मोठ्या संख्येने लोक जमा होणार. यामुळे संक्रमणाचा धोका अधिक वाढेल आणि कुत्र्याचे मांस खाऊन हा धोका दुपटीने वाढेल. विशेष म्हणजे Shenzhen आणि Zhuhai प्रांताच्या सरकारने कोरोना व्हायरस पाहता कुत्र्याचे मांस खाण्यावर बंदी घातली असल्याचे मत ह्युमन सोसायटी इंटरनॅशनलचे चायना पॉलिसीचे एक्सपर्ट पीटर ली व्यक्त केले आहे.

    जगभरातून Dog’s meet फेस्टिव्हल होतेय टीका

    फेब्रुवारी २०२०च्या अखेरीस चीनने जंगली प्राण्यांच्या व्यापाऱावर तसेच त्यांच्या खाण्यावर स्थगिती आणली होती. वटवाघूळ खाल्ल्यानंतर कोरोना पसरल्याची आशंका व्यक्त केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला होता. यानंतर सांगितले जात होते की डॉग मीट फेस्टिव्हल्सवर पूर्णपणे बंदी घातली जाईल. मात्र असे झाले नाही. ना सरकारला ना चीनच्या नागरिकांना ही क्रूर परंपरा संपवायची आहे. दरम्यान, जगभरातून मात्र चीनच्या या फेस्टिव्हलवर टीका केली जात आहे.