डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल, टिकटॉक करणार बॅन

चीनवर नाराज असलेल्या अमेरिकेने भारताच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानुसार, अमेरिका टिकटॉक बॅन करण्याच्या विचारात आहे. भारताने टिकटॉकसह १०६ ॲप्स यापूर्वीच बॅन केले आहेत.

वॉशिंग्टन : चीनवर नाराज असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मोदींच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. डोनाल्ड ट्रम्प चीनी ॲप टिकटॉक बॅन करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी ते सर्व शक्यता पडताळून पाहात आहेत. कोरोनाच्या उद्रेकानंतर ट्रम्प हे चीनवर पूर्णपणे नाराज आहेत.

आम्ही टिकटॉकवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही टिकटॉक बॅन करू शकतो. आम्ही याबाबत वेगळा विचाराही करू शकतो, आमच्याकडे विविध पर्याय आहेत, पण आम्ही टिकटॉक संबंधी  अन्य काही पर्यांयांचा विचार करता येईल का? याकडे आमचे लक्ष आहे अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.

टिकटॉकबाबत कठोर निर्णय घ्या; रिपब्लिकन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली मागणी

आता अमेरिकाही भारताने घेतलेल्या निर्णयाचा आधार घेत टिकटॉक बॅन करण्याच्या विचारात आहे. याबाबत अमेरिकन काँग्रेसच्या २५ सदस्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत ठोस निर्णय घेऊन अमेरिकन जनतेचा डेटा सुरक्षित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आग्रही मागणी केली आहे. टिकटॉकच्या डेटामुळे चीनचा कम्युनिस्ट पक्ष यामुळे अधिक ताकदवान होईल अशी शक्यता या शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.

भारत चीनवर सातत्याने करतो आहे डिजीटल स्ट्राइक

चीनशी संबंधित कंपन्यांवर भारत सरकारचा सातत्याने डिजीटल स्ट्राइक सुरूच आहे. भारताने चीनचे ४७ आणखी ॲप्स बॅन केले आहेत. यापूर्वीही चीनचे ५९ ॲप्स भारताने बॅन केले असून यात टिकटॉकचाही समावेश आहे. नंतर बॅन करण्यात आलेल्या ॲप्समध्ये अधिकाधिक क्लोनिंग ॲप्सचा समावेश आहे. आधी बॅन केलेल्या ॲप्ससारखेच ॲप तयार करून ते नव्याने दाखल झाले होते. या ॲप्सवर युजर्सचा डेटा चोरी केल्याचा आरोप आहे. गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांशी झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनी ॲप्सविरोधात ही कारवाई केली होती.