donald trump

अध्यक्षपदाची निवडणूक हरल्यापासून ट्रम्प यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या(trump losing twitter followers) संख्येत एक लाखांहून अधिक घट झाली आहे, त्याचवेळी जो बायडन (Joe Biden) यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या चक्क दहा लाखांनी वाढली आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये बायडेन यांच्यापेक्षा कमी मते मिळाल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. आता त्यांचे ट्विटरवरील फॉलोअर्स(donald trump twitter followers decreased) कमी झाले आहेत.

ट्रम्प यांची सार्वजनिक वक्तव्य आणि त्याला मिळणारा प्रतिसाद याची नोंद ठेवणाऱ्या फॅक्टबेस या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदाची निवडणूक हरल्यापासून ट्रम्प यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येत एक लाखांहून अधिक घट झाली आहे, त्याचवेळी जो बायडेन (Joe Biden) यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या चक्क दहा लाखांनी वाढली आहे.

ट्रम्प यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत १८ नोव्हेंबरपासून दिवसाला साधारण एक हजाराने घट झाली आहे. फॅक्टबेसने केलेल्या पाहणीनुसार, सलग अकरा दिवस ट्रम्प यांच्या फॉलोअर्सची संख्या कमी होत आहे.  १८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सलग १२ दिवस फॉलोअर्सची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

ट्रम्प यांचे तब्बल ८८.८ दशलक्ष फॉलोअर्स होते. दरम्यान ट्रम्प सातत्याने निवडणूकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप करणारे, त्यांनीच निवडणूक जिंकली असल्याचा दावा करणारे ट्वीट्स करत होते. अगदी अलीकडेच त्यांनी ‘आम्ही हरूच शकत नाही’(No way we Lost) असं ट्विट केलं आहे.  ट्विटरने त्यांच्या ट्विटसची पडताळणी करून बहुतांश पोस्टस या चुकीच्या असल्याचं म्हटलं आहे. मात्र अद्यापही ट्रम्प यांना ते हरल्याचं पटलेलं नाही. जो बायडेन (Joe Biden) यांचे ट्विटरवर १ डिसेंबरपर्यंत २०.२ दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत.  गेल्या आठवड्यापासून त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.