डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोदींचं कौतुक, मोदी माझे चांगले मित्र

डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत. ते खूपच चांगले काम करत आहेत. आमच्या रिपब्लिकन पक्षाला भारतीयांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत अमेरिकेतील भारतीय लोक आम्हाला मतदान करतील, असे वाटते.

भारत-चीन यांच्यातील तणावाच्या परिस्थितीसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी काल शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये भाष्य केले. तसेच चीन भारतावर मुजोरी करत आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले की, मला तसे वाटत नाही. पण अनेकांच्यादृष्टीने ते निश्चितच अनाकलनीय अशा आक्रमकपणे वागत आहेत. त्यामुळे सध्या भारत-चीन सीमारेषेवरील परिस्थिती धोकादायक झाली आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.

या पत्रकारपरिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र (Modi is my best friend) आहेत. ते खूपच चांगले काम करत आहेत. आमच्या रिपब्लिकन पक्षाला भारतीयांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत अमेरिकेतील भारतीय लोक आम्हाला मतदान करतील, असे वाटते. कोरोनाची साथ येण्यापूर्वीच मी भारतात गेलो होतो. तेथील लोक खूप अद्भूत आहेत. भारताला महान नेता (you got a great leader) आणि महान जनता लाभल्याचेही यावेळी ट्रम्प यांनी सांगितले.

अमेरिकन भारतीय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या नात्यावर ट्रम्प यांनी प्रकाश टाकला. तीन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणूकीत अमेरिक भारतीय नागरिक मला मतदान करतील. अमेरिकन भारतीय नागरिकांचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आपल्याला समर्थन आहे. अमेरिकेतील भारतीय लोक मला मतदान करतील असा विश्वास आहे. असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.