कोरोनामुळे भारताचं कंबरडं मोडलं, ट्रम्प यांनी केली चीनकडून भरपाईची मागणी

भारतातल्या लोकांना खूप चांगले काम करत आहोत असे म्हणायची सवय आहे. पण सत्य परिस्थिती ही आहे की, देश उद्ध्वस्त झाला आहे. खरं तर, प्राणघातक कोरोना संसर्गामुळे(Corona Spread) प्रत्येक देश उद्ध्वस्त झाला आहे,असे ट्रम्प(Donald Trump) यांनी म्हटले आहे.

    कोरोना विषाणूमुळे(Corona Virus) भारताची परिस्थिती गंभीर झाली आहे. जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार करण्यास कारणीभूत असल्याबद्दल चीनने अमेरिकेला १० ट्रिलियन अमेरिकी डॉलर द्यावे असा दावा अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी गुरुवारी केला आहे. एका मुलाखतीत ट्रम्प यांनी ही मागणी केली आहे. जगभरात कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. याआधी ट्रम्प यांनी कोरोनाला चिनी आणि वुहान येथील व्हायरस असल्याचे म्हटले होते.

    कोरोना व्हायरस जगभर पसरण्यावर ही एक दुर्घटना असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी भारतील परिस्थितीची माहिती देत याआधी कधी कोणत्याही आजारामुळे इतके मृत्यू झाले नसल्याचे म्हटले.

    “भारतात सध्याची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. भारतातल्या लोकांना खूप चांगले काम करत आहोत असे म्हणायची सवय आहे. पण सत्य परिस्थिती ही आहे की, देश उद्ध्वस्त झाला आहे. खरं तर, प्राणघातक कोरोना संसर्गामुळे प्रत्येक देश उद्ध्वस्त झाला आहे. आता चीनने या सर्व देशांना मदत केली पाहिजे,” असे ट्रम्प यांनी म्हटले.

    “जरी ही घटना दुर्घटनेमुळे झाली असली तरी तुम्ही त्या देशांकडे पाहा ते आता पुन्हा आधीसारखे होणार नाहीत. आपल्या देशावरही याचा वाईट परिणाम झाला आहे. पण बाकीच्या देशांना आपल्यापेक्षा जास्त हानी पोहोचली आहे. त्यामुळे हा व्हायरस कुठून आणि कसा आला याचा शोध घ्यायला हवा” असे ट्रम्प म्हणाले.

    २०१९ मध्ये चीनमधील वुहानमध्ये कोरोनाची लागण झाल्याची पहिली घटना समोर आली होती. करोना विषाणू चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधून बाहेर पडला असावा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. चीनने मात्र वेळोवेळी अमेरिकेचा हा आरोप नाकारला आहे.