अमेरिकेत व्हाइट हाउसच्या बाहेर गोळीबार; ट्रम्प म्हणाले आता परिस्थिती नियंत्रणात

अमेरिकेत व्हाइट हाउसच्या बाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती खुद्द राष्ट्रपची डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. या दरम्यान राष्ट्रपती ट्रम्प यांचे भाषण सुरू होते. यावरही याचा परिणाम झाला आहे.

वॉशिंग्टन : व्हाइट हाउस (White House) च्या बाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी याबाबत माहिती दिली आहे. व्हाइट हाउसच्या बाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली अशी सूचना मिळाली आहे असे त्यांनी नमूद केले. पण, आता परिस्थिती नियंत्रणात आहे. गुप्तचर विभागाच्या (US Secret Service) अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केल्याने गोळीबार करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला गोळी लागली असल्याची माहिती दिली आहे. त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. सोबतच ट्रम्प यांनी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तात्काळ कारवाईमुळे त्यांचे आभार मानले आहेत.

गोळीबार झाल्यानंतर ट्रम्प यांच्या भाषणावरही झाला परिणाम

उपलब्ध माहितीनुसार, अमेरिकेच्या व्हाइट हाउसच्या बाहेर गोळीबार झाल्याची माहिती स्वत: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली. या दरम्यान त्यांचे भाषण सुरू होते यावरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यांना काही काळ त्या ठिकाणाहून दूर नेण्यात आलं. तात्काळ गुप्तचर विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करत संशयितावर गोळीबार केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली.

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाची तात्काळ कारवाई

गोळीबाराच्या या घटनेला गुप्तचर विभागाने दुजोरा दिला आहे. १७ वा रस्ता आणि पेंसिल्वेनिया अव्हेन्यू मध्ये झालेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. गोळीबार झाल्यानंतर तात्काळ कारवाई केल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या विभागाचे आभार मानले आहेत. या विभागाने तात्काळ कारवाई करत आपले कर्तव्य चोख बजावले आहे.

या वर्षाअखेरीस येणार कोरोना लस : ट्रम्प

अमेरिकेतील कोरोना संकटाबाबत माहिती देताना ट्रम्प म्हणाले, आम्ही जवळपास साडेसहा कोटी जणांच्या चाचण्या केल्या असून आजवर अन्य कोणत्याही देशाने एवढ्या प्रमाणात चाचण्या केलेल्या नाहीत. १ कोटी चाचण्या करणारा भारत दुसऱ्या स्थानी आहे. कोरोना विरुद्धच्या या लढाईत या वर्षाच्या अखेरीस आमच्याकडे नक्कीच लस उपलब्ध असेल असा विश्वास ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला.