डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहान भावाचे निधन

डोनाल्ड ट्रम्प यांचे बंधू रॉबर्टसुद्धा बिझनेसमॅन होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पत्रक जारी करत आपल्या भावाचे निधन झाल्याची बातमी दिली आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे छोटे भाऊ रॉबर्ट ट्रम्प यांचे शनिवारी रात्री रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. शुक्रवारी गंभीर आजारी असलेल्या आपल्या भावाला भेटण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी रुग्णालयात गेलेले. डोनाल्ड ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “माझा भाऊ रॉबर्ट आज रात्री मरण पावला याबद्दल मी तुम्हाला अतिशय दु:खी मनाने कळवत आहे.”

तो फक्त माझा भाऊ नव्हता, तर माझा सर्वात चांगला मित्र देखील होता. परंतु आपण पुन्हा भेटू. त्याच्या आठवणी माझ्या मनात कायम ताज्या राहतील. रॉबर्ट, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमच्या आत्म्याला शांती लाभो. ” रॉबर्ट डोनाल्ड ट्रम्प यांचे अगदी जवळचे होते. ट्रम्प परिवाराच्या वतीने नातेवाईकांच्या कुटुंबाबद्दलचे पुस्तक छापणे थांबवण्यासाठी त्यांनी केस दाखल केली.

डोनाल्ड ट्रम्प यांचे बंधू रॉबर्टसुद्धा बिझनेसमॅन होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पत्रक जारी करत आपल्या भावाचे निधन झाल्याची बातमी दिली आहे.