dr anthony fauci

अमेरिकेतील साथरोग तज्ञ डॉ. अँथनी फौची(Dr. Anthony Fauci) यांनी अलीकडेच कोरोनामुळे मृत्यू(Death By Corona) झालेल्यांपैकी ९९.२ टक्के लोक असे आहेत ज्यांनी कोरोना लस(Unvaccinated People Died In America) घेतलेली नव्हती असं म्हटलं आहे.

  कोरोनामुळे जगभरात मृत्यू(Corona Deaths) झालेल्यांची संख्या ४० लाखांच्या जवळ पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत चार लाख लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दरम्यान कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका (America)पहिल्या क्रमांकावर आहे.

  अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत सहा लाख २१ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान अमेरिकेतील साथरोग तज्ञ डॉ. अँथनी फौची(Dr. Anthony Fauci) यांनी अलीकडेच कोरोनामुळे मृत्यू(Death By Corona) झालेल्यांपैकी ९९.२ टक्के लोक असे आहेत ज्यांनी कोरोना लस(Unvaccinated People Died In America) घेतलेली नव्हती असं म्हटलं आहे.

  हे मृत्यू खूपच निराशाजनक आहेत कारण ते टाळता आले असते असं डॉ. अँथनी फौची यांनी सांगितलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, “कोरोनाच्या रुपातील धोकादायक शत्रू आपल्यासमोर असताना आणि त्याच्यावरील गुणकारक उपाय असतानाही देशभरात त्यांची अंमलबजावणी होत नाही हे निराशाजनक आहे. जर लस वेळेत आली असती तर जगभरातील अनेक मृत्यू टाळता आले असते”.

  डॉ. अँथनी फौची यांनी यावेळी अमेरिकेतील काही नागरिकांकडून होणाऱ्या विरोधावरुन टीका करताना काही विचारवंत लसविरोधी आहेत की विज्ञानविरोधी आहेत अशी विचारणा केली आहे. डॉ. अँथनी फौची यांनी लोकांना कोरोना हा प्रत्येकाचा शत्रू आहे हे समजून घ्या अशी विनंती केली आहे.

  “पर्याप्त लसीचे डोस उपलब्ध असल्याने अमेरिका भाग्यवान आहे. अमेरिकेतील सर्व लोकांचं लसीकरण होऊ शकतं इतके डोस उपलब्ध आहेत”, असं सांगताना अँथनी फौची यांनी काही देशातील लोक लस मिळण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.

  कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत.कोरोनामुळे जगभरात ३९ लाख ९४ हजार लोकांनी आपला जीव गमावला असून यापैकी ६ लाख २१ हजार २९३ लोक एकट्या अमेरिकेतील आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेतील ३ लाख ४५ हजार लोकांना करोनाची लागण झाली असून सध्याच्या घडीला ४० लाख सक्रिय रुग्ण आहेत.