The risk of corona infection is higher if the car windows are closed

लंडन : लायसन्स शिवाय गाडी चालवणे हा दंडनिय अपराध ठरतो. त्यामुळे लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया पार पाडूनच गाडी घेऊन रस्त्यावर उतरणे इष्ट ठरते. मात्र गाडीचे लायसन्स काढणे काही जणांसाठी आनंदायी ठरते तर काही जणांसाठी डोकेदुखी... गाडी चालवण्याचे स्कील योग्यरीत्या आत्मसात केले असतील तर लायसन्स लगेच मिळते . आधी परिक्षा आणि नंतर मग थेट गाडी चालवण्याची ट्रायल अशा दिव्यातून वाहनचालकाला जावं लागतं.

लंडन : लायसन्स शिवाय गाडी चालवणे हा दंडनिय अपराध ठरतो. त्यामुळे लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया पार पाडूनच गाडी घेऊन रस्त्यावर उतरणे इष्ट ठरते. मात्र गाडीचे लायसन्स काढणे काही जणांसाठी आनंदायी ठरते तर काही जणांसाठी डोकेदुखी… गाडी चालवण्याचे स्कील योग्यरीत्या आत्मसात केले असतील तर लायसन्स लगेच मिळते . आधी परिक्षा आणि नंतर मग थेट गाडी चालवण्याची ट्रायल अशा दिव्यातून वाहनचालकाला जावं लागतं. पण काही जण यासाठी पात्र होत नाहीत .अनेकदा काहीजण पहिल्याच वेळेस ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पास होतात तर काहींना पाच-दहा-पंधरावेळादेखील टेस्ट पास करता येत नाही. मात्र लंडनमधील एका पठ्ठ्याने तब्बल १५७ वेळा ड्रायव्हींग टेस्ट नापास झाल्यानंतर लायसन मिळवले आहे.

हार न मानण्याचे कौतुक
असे असले तरी त्याने कधी हार माणून माघार पत्करली नाही. आणि सरतेशेवटी १५८ व्या प्रयत्नावेळी तो यशस्वी ठरला. ही घटना घडलीय दि ग्रेट ब्रिटनमध्ये… या व्यक्तीने आपलं नाव जाहीर करण्यास नकार दिलाय. त्याच्या या हार न मानण्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. या व्यक्तीला लायसेन्स काढायला किती खर्च आला असेल आपण कल्पना करु शकताच. या व्यक्तीला तब्बल तीन लाख रुपयांचा खर्च आला आहे. इतक्या वेळेला टेस्ट देण्याचा पराक्रम फक्त या व्यक्तीनेच गाजवलाय असं नाहीये तर याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. ड्रायव्हींग एँड व्हेईकल स्टँडर्स एजन्सी द्वारे जाहीर केल्या गेलेल्या आकडेवारीवरुन समजतं की इंग्लंडमध्ये आतापर्यंत सर्वांत खराब कामगिरी एका महिलेची राहिली आहे. या महिलेने ११७ वेळा थेअरीची परिक्षा दिली आहे आणि तिने ती अद्याप पास केलेली नाहीये. तिसऱ्या क्रमांकावर एक ४८ वर्षांची महिला होती जिने शेवटी ९४ व्या प्रयत्नात ही परिक्षा पास केली आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे की, एवढ्या वेळेला नापास झाल्यावर अशा व्यक्तींना लायसन्स देऊच नये. तर काहीचं म्हणणं आहे की प्रयत्न करुन यश कमावणाऱ्यांना त्याचं फळ मिळायलाच हवं. यामध्ये लज्जास्पद काही नाहीये.