सौदी अरेबियातील विमानतळा‌वर ड्रोन हल्ला -आठ जण जखमी, एका विमानाचे नुकसान

सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोन हल्ला(Drone Attack On Airport Of Saudi Arabia) करण्यात आला आहे. या हल्ल्यात ८ जण जखमी झाले आहेत.

    सौदी अरेबियामध्ये(Saudi Arabia) धक्कादायक घटना घडली आहे. सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोन हल्ला(Drone Attack On Airport Of Saudi Arabia) करण्यात आला आहे. या हल्ल्यात ८ जण जखमी झाले आहेत. एका विमानाचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांत आभा विमानतळावर हा दुसरा ड्रोन हल्ला आहे. हा हल्ला कुणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    यापूर्वीच्या विमानतळावरील हल्ल्यात कोणीही जखमी झाले नव्हते. येमेनमधील इराण समर्थित शिया बंडखोरांशी लढणाऱ्या सौदी नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. २०१५ पासून सौदीच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीशी लढणाऱ्या येमेनच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियातील लष्करी कार्यालये आणि गंभीर पायाभूत सुविधांसह आंतरराष्ट्रीय विमानतळांना लक्ष्य केले आहे.