scott morrison

ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातून ऑस्टेलियाला जाणाऱ्या सर्व प्रवासी विमानांची उड्डाणे १५ मे पर्यंत रद्द (Australia suspend all direct passenger flights from India until 15 may) करण्याचा निर्णय घेतला आहे.

    भारतात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या नागरिकांवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर आता ऑस्ट्रेलियानेदेखील निर्णय घेतला आहे.ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी एक घोषणा केली आहे.

    ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातून ऑस्टेलियाला जाणाऱ्या सर्व प्रवासी विमानांची उड्डाणे १५ मे पर्यंत रद्द (Australia suspend all direct passenger flights from India until 15 may) करण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी एअर इंडियानं ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमानं रद्द केली आहेत. सध्या भारतात आयपीएलचा हंगाम सुरू असून ऑस्ट्रेलियातील अनेक खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि काही नागरिक देखील भारतात दाखल आहेत. ते देखील या निर्णयामुळे भारतात अडकून राहू शकतात. त्यांना आता १५ तारखेपर्यंत ऑस्ट्रेलियाला परत जाता येणार नाही.


    ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले की, “१५ मे पर्यंत विमानांवर असलेली ही बंदी कायम राहणार आहे. भारतातून येणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाचा धोका वाढू शकतो म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.”

    याआधी थायलंड, नेदरलँड, इराण, कॅनडा, युएई, हाँगकॉंग या देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांच्या देशातील प्रवेशावर बंदी घातली आहे.