भारतामध्ये कोरोनाचे संकट वाढत असताना सीमेवर चीनच्या सैनिकांचा शिरकाव, एकिकडे मदतीचा हात दुसरीकडे वेगळाच डाव

चीनचा कावेबाजपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. चीनी ड्रॅगननं पुन्हा एकदा भारतीय सीमेत शिरकाव(chinese soldiers entered in India) केल्याची माहिती समोर आली आहे.

    भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. अशा परिस्थितीत अमेरिका, रशिया, जर्मनी आणि फ्रान्ससहीत अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिला आहे. चीननेही भारताला मदतीच्या हात पुढे केला आहे. मात्र चीनचा कावेबाजपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. चीनी ड्रॅगननं पुन्हा एकदा भारतीय सीमेत शिरकाव(chinese soldiers entered in India) केल्याची माहिती समोर आली आहे.

    पूर्व लडाखमध्ये चीनी सेनेनं घुसखोरी केली आहे. त्याचबरोबर चीनी सैनिकांनी स्थायी निवास आणि डेपोची निर्मितीही केली आहे. त्यामुळे सीमेवर पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

    या वर्षाच्या सुरुवातीलाच भारत आणि चीन दरम्यान तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. चीननं मोठ्या संख्येनं सीमेवर सेना तैनात केली होती. तसेच भारतीय सीमेत शिरकावही केला होता. त्यामुळे भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना बंदीस्त केलं होतं. त्यानंतर दोन्ही सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या.

    मागच्या वर्षी मे महिन्यात भारत आणि चीनमध्ये सीमेवरून वादाला सुरुवात झाली. त्यानंतर दोन्ही देशाचे सैनिक भिडले होते. १५ जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला होता. त्यांना भारतीय सैनिकांनी जशाच तसं उत्तर दिलं होतं.

    कोरोनाशी लढण्यासाठी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच ती मदत करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे  चीननं पुन्हा एकदा सीमेवर कुरापती सुरु केल्या आहेत.