अमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश

अमेरिकेत रात्री ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास जमिनीखाली २९ मैलांवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुदैवानं भूकंपाच्या केंद्रापासून दूरपर्यंत या भूकंपाचा प्रभाव जाणवला नाही. या भूकंपात कुठलीही जिवित किंवा वित्त हानी झाल्याचेही वृत्त नाही. मात्र यामुळे अमेरिकेच्या किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे.

    अमेरिकेतील (US) अलास्का (Alaska) येथे ८.२ तीव्रतेचा भूंकप (Earthquake) आला असून येथील परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा भूकंप बुधवारी अलास्का परिसरात रात्री ११ वाजताच्या सुमारास झाला होता. यावेळी जमिनीखाली २९ मैलांवर केंद्रबिंदू असल्याचं सांगितलं जात आहे. या भूकंपामुळे भविष्यात त्सुनामी (Tsunami) येण्याचा इशारा देण्यात आला असून अमेरिकेतील सर्व समुद्रकिनाऱ्यांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत रात्री ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास  जमिनीखाली २९ मैलांवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुदैवानं भूकंपाच्या केंद्रापासून दूरपर्यंत या भूकंपाचा प्रभाव जाणवला नाही. या भूकंपात कुठलीही जिवित किंवा वित्त हानी झाल्याचेही वृत्त नाही. मात्र यामुळे अमेरिकेच्या किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे.

    त्सुनामीचा इशारा

    अशा प्रकारे जमिनीखाली होणारे भूकंप हा त्सुनामीचा इशारा असतो, हे यापूर्वीही अऩेकदा सिद्ध झालं आहे. अमेरिकेत यापूर्वी आलेल्या त्सुनामीपूर्वी भूकंपाचं सत्र अनुभवायला मिळालं होतं. भूगर्भातील हालचालींवर त्सुनामीचा अंदाज काढता येत असल्यामुळे जर भूकंपाच्या धक्क्यांचं हे सत्र सुरुच राहिलं, तर त्सुनामी येण्याची शक्यता अधिक गडद होत जाईल, असं भूगर्भ शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.