Earthquake shakes China; Three were killed and several were injured

चीनच्या युन्नान प्रांतात आलेल्या एका मागोमाग एक भूकंपाच्या धक्क्याने चीनची जमीन हादरली. या दुर्घटनेत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 27 पेक्षा अधिक लोक गंभीररित्या जखमी आहेत.

    बीजिंग : चीनच्या युन्नान प्रांतात आलेल्या एका मागोमाग एक भूकंपाच्या धक्क्याने चीनची जमीन हादरली. या दुर्घटनेत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 27 पेक्षा अधिक लोक गंभीररित्या जखमी आहेत.

    सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे प्रमुख यांग गुओजोंग यांनी सांगितल्याप्रमाणे दाली शहरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. परंतु यांग्बी येथे त्याचा परिणाम सहन करावा लागला.

    यांग्बी काऊंटी येथे 2 लोकांचा तर योंगपिंग काऊंटीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. सरकारी वृत्तसंस्थेने सांगितल्याप्रमाणे भूकंपाच्या तीव्र धक्क्याने 3 जणांचा मृत्यू झाला असून 27 हून अधिक जखमी झाले आहेत.