हत्तीचा किंसीग व्हिडीओ व्हायरल, नोटकरी म्हणतायत ‘वा बेटा मौज करदी’

अवघ्या 19 सेकंदांचा हा व्हिडिओ भन्नाट आणि युनीक आहे. दोन हत्ती एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी जवळ येतात आणि हवेत सोंड हलवताना चुंबन घेतात. केनियास्थित संस्था शेल्ड्रिक वन्यजीव ट्रस्टने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर शेअर केला आहे.

    अनेक वेळा असे काही विचार तुमच्या मनात येतात, ज्याचा विचार केल्यानंतर तुम्ही लगेच उत्तर जाणून घेण्यास उत्सुक होतात. इंटरनेटच्या युगात काही प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात, पण असे काही व्हिडिओ क्वचितच पाहायला मिळतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की, हत्ती एकमेकांना किस कसा करतात? जर नाही, तर आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू, जो पाहिल्यानंतर तुमचा दिवस आनंददायी जाइल.

    अवघ्या 19 सेकंदांचा हा व्हिडिओ भन्नाट आणि युनीक आहे. दोन हत्ती एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी जवळ येतात आणि हवेत सोंड हलवताना चुंबन घेतात. केनियास्थित संस्था शेल्ड्रिक वन्यजीव ट्रस्टने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर शेअर केला आहे. ही संस्था हत्तींना वाचवण्यासाठी, त्यांना नवीन जीवन देण्यासाठी आणि अनाथ हत्तींच्या मुलांना आधार देण्याचे काम करते. क्लिपमध्ये दोन हत्तींची बाळं एकमेकांना किस करताना दिसत आहेत. ट्रस्टने पोस्ट केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘हत्तीचे चुंबन’ असे लिहिले आहे.

    हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर, 16,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत आणि त्याची अजूनही संख्या वाढत आहे. व्हिडिओला सुमारे 3,000 लाइक्स देखील मिळाले. या व्हिडिओवर लोकांनी वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, ‘मी पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट.’ तर एका युजरने ‘वा बेटा मौज करदी’ असं म्हटलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप धुमाकुळ घातल आहे.