पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना मातृशोक, पीएम मोदींनी पत्र लिहून व्यक्त केल्या भावना

मागील महिन्यात २२ नोव्हेंबर रोजी लंडनमध्ये (London) बेगम शमीम अख्तर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर देशाचे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी २७ नोव्हेंबरला नवाज शरीफ (Former Prime Minister of Pakistan Nawaz Sharif) यांना पत्र (Letter) लिहिलं होतं. २०१५ मध्ये लाहोर येथील भेटीदरम्यान बेगम शमीम अख्तर यांची भेट झाली होती. त्याची आठवण म्हणून पत्रातून मोदींनी दुख: व्यक्त केलं आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Former Prime Minister of Pakistan Nawaz Sharif)  यांना मातृशोक झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये त्यांनी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांची आई बेगम शमीम अख्तर (Begum Shamim Akhtar) यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मागील महिन्यात २२ नोव्हेंबर रोजी लंडनमध्ये (London) बेगम शमीम अख्तर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर देशाचे पंतप्रधान मोदी यांनी २७ नोव्हेंबरला नवाज शरीफ यांना पत्र (Letter) लिहिलं होतं. २०१५ मध्ये लाहोर येथील भेटीदरम्यान बेगम शमीम अख्तर यांची भेट झाली होती. त्याची आठवण म्हणून पत्रातून मोदींनी दुख: व्यक्त केलं आहे.

पीएम मोदींनी पत्रातून व्यक्त केल्या भावना

शोक संदेश व्यक्त करताना ११ डिसेंबर आणि २७ नोव्हेंबर असे दोन पत्र समोर आले आहेत. २७ नोव्हेंबरला मोदींनी नवाज शरीफ यांना पत्र लिहिलं होतं आणि ११ डिसेंबरला भारतीय राजदूत गौरव अहलूवालिया यांनी मरियम नवाज यांच्या नावे पत्र लिहिलं होतं. इस्लामाबादस्थित भारतीय उच्चायुक्तांनी हे पत्र नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांना पाठवले आणि या पत्राबाबत आपल्या वडीलांना कळवण्यास सांगितले. भारतीय उच्चायुक्तांनी मरियम नवाज यांना लिहिलेल्या पत्रात इस्लामाबादस्थित भारतीय उच्चायुक्तचे उपायुक्त गौरव अहलूवालिया यांची स्वाक्षरी आहे. तसेच ११ डिसेंबरची तारीख पत्रावर नमूद केली आहे.

बेगम अख्तर यांच्या स्वभावाचं मोदींनी केलं कौतुक

पीएम मोदींनी नवाज शरीफ यांच्या आईच्या स्वभावाचं कौतुक केलं आहे. त्यांचं साधेपण आणि मार्मिकपणाचं वास्तव कशापद्धतीने होतं. हे त्यांनी सांगितलं आहे. तसेच या दुख:त सामील होऊन मी देवाला प्रार्थना करतो की, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला या दुख:तून सावरण्याची शक्ती देवो.

२२ नोव्हेंबरला लंडनमध्ये झालं निधन

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची आईचं २२ नोव्हेंबरला लंडनमध्ये निधन झालं. त्यावेळी बेगम शमीम अख्तर ९१ वर्षांच्या होत्या. तसेत जवळपास एक महिन्यापेक्षा अधिक वेळ बेगम अख्तर अस्वस्थ होत्या. बेगम अख्तर यांच्या निधनानंतर त्याचं पार्थिव लाहोरमधील जती उमराजवळील शरीफ कुटुंबातील पैतृक गावात आणलं गेलं. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.