Entry into India through fake Aadhaar card; There was a long queue at the border of Nepal to make fake Aadhaar cards

काठमांडू : अवैध्यरीत्या भारतात वास्तव्य करणाऱ्या नागरीकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बनावट आधार कार्डद्वारे यांना भारतात एन्ट्री दिली जाते. बनावट आधार्ड कार्ड बनवण्यासाठी नेपाळच्या बॉर्डरवर भली मोठी रांग पहायला मिळाली.

एकीकडे भारत आणि नेपाळ दरम्यान तणावपूर्ण वातावरण आहे. त्यात आता दुसरीकडे कोरोना काळात नेपाळमध्ये बनावटरित्या भारतीय आधार कार्ड बनवण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतात प्रवेश करण्यासाठी बुधवारी बनबसा सीमेवर नेपाळी नागरिकांची लांबच लांब रांग लागली होती.

बनबसा सीमेवरून भारतात येण्यासाठी अनेक नेपाळी नागरिक भारतीय आधार कार्ड तयार करतात. यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.

दरम्यान, नेपाळमधून भारतात प्रवेश करणाऱ्या सर्व लोकांच्या ओळख पत्रासह, आवश्यक माहिती पाहिली जात आहे. त्याशिवाय हे नेपाळी लोक भारतात कुठे आणि कोणतं काम करतात याचीही चौकशी केली जात असल्याचे टनकपूरचे एसडीएम ऑफिसर हिमांशु कफाल्टिया यांनी सांगितले. तसंच कोणत्या ठेकेदाराने त्यांचं आधार कार्ड बनवलं याचाही तपास घेतला जात असल्याचेही ते म्हणाले.
लॉकडाउनपासून म्हणजेच मार्च महिन्यात भारत-नेपाळशी जोडणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या होत्या.