पाकव्याप्त काश्मीरमध्येही चीनला विरोध, नागरिकांनी रस्त्यावर उतरुन केला निषेध

मुजफ्फराबाद शहरात मोठ्या संख्येने लोकांनी जोरदार मशाल मिरवणूक आणि निषेध मोर्चा काढला. नीलम-झेलम वर धरण बांधू नये आणि आम्हाला जगू द्या, अशी घोषणा पीओकेचे लोक करत होते. या धरणांमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे.

मुजफ्फराबाद : चीनच्या योजना पूर्ण करण्यात व्यस्त पाकिस्तानचे इम्रान खान सरकार पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेचा आवाज ऐकत नाही आहेत. पुन्हा एकदा पीओकेची राजधानी मुझफ्फराबादमध्ये, चिनी बाजूने या भागात बांधल्या जाणाऱ्या मोठ्या धरणांना मोठ्या संख्येने लोकांनी तीव्र विरोध दर्शविला. पीओकेच्या लोकांनी मशाल रॅली काढून नीलम-झेलम नद्यांवर बांधल्या जाणाऱ्या धरणाला विरोध केला.


यापूर्वीही मुजफ्फराबाद शहरात मोठ्या संख्येने लोकांनी जोरदार मशाल मिरवणूक आणि निषेध मोर्चा काढला. नीलम-झेलम वर धरण बांधू नये आणि आम्हाला जगू द्या, अशी घोषणा पीओकेचे लोक करत होते. या धरणांमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे, असे आंदोलकांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये लोक ट्विटरवर # सेव्हरायव्हर्ससेव्हएजेके हॅशटॅग ट्विट करून निषेध करत आहेत. आंदोलकांनी प्रशासनाला प्रश्न विचारला की या कायद्याच्या अंतर्गत चीन आणि पाकिस्तान या वादग्रस्त जमिनीवर धरणाचे बांधकाम करण्याचा करार कोणत्या कायद्यांतर्गत झाला आहे? ते म्हणाले की, पाकिस्तान आणि चीन नद्या काबीज करुन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उल्लंघन करीत आहेत.