अय्या खरचं…कोरोना झालाय की नाही हे आता कुत्र्यांनाही समजतं ; अँटिजन चाचणीपेक्षाही दोन मिनिटांत रिझल्ट समोर

पॅरिसच्या नॅशनल व्हेटरनरी स्कूल ऑफ एल्फोर्डमध्ये याबाबत अधिक संशोधन करण्यात आले आहे. हे कुत्रे त्या व्यक्तीच्या घामाच्या वासावरून त्याच्यात झालेल्या कोरोना संक्रमणाबाबत अचूक अनुमान काढू शकतात, असे दिसून आले आहे. रॅपिड अँटिजन चाचणीत निदान करण्यासाठी किमान १५ मिनिटे लागतात. निदान करण्याचे हे काम कुत्रे काही मिनिटात करण्यास सक्षम आहेत.

    नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं संपूर्ण जगभरात हाहाकार उडाला आहे. या रोगावर औषधे, प्रतिबंधात्मक लस शोधण्याबाबत युद्दपातळीवर संशोधन सुरू आहे. परंतु एखाद्या व्यक्तीला कोरोना झाली की नाही, हे आता कुत्रे सुद्धा शोधू शकतात, असे दिसून आलं आहे.

    फ्रान्समधील वैज्ञानिकांना केलेल्या संशोधनात, गुन्ह्याचा तपास करणारे कुत्रे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे शोधू शकतात, असे दिसून आले आहे. गुन्हे तपासासाठी मदत घेतली जात असलेले कुत्रे वास घेण्याच्या शक्तीसाठी प्रशिक्षित केलेले असतात.

    फ्रान्सच्या वैज्ञानिकांना असे आढळून आले आहे की, हे कुत्रे एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे आरटीपीसीआर चाचणीच्या निष्कर्षापेक्षाही जास्त अचूकपणे सांगण्यास सक्षम आहेत.