airpark village

 एअरपार्क नावाचं एक गाव आहे. (USA Air Parks Village) एका सोशल मीडिया युझरने इन्स्टाग्रामवर या गावाचा एक व्हिडिओ शेअर(video of airpark village) केला आहे. या व्हिडिओमध्ये एअरपार्क(airpark) गावात प्रत्येकाच्या घरासमोर एक विमान(village with many airplane) असल्याचं दिसून येत आहे.

  वॉशिंग्टन : आपल्याकडे एकतरी गाडी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी  प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र अमेरिकेतल्या एका शहराने तर कमाल केली आहे. या शहरामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर एक एक विमान आहे. तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र खरंच असं एक गाव आहे.

  एअरपार्क असं या गावाचं नाव आहे. (USA Air Parks Village). एका सोशल मीडिया युझरने इन्स्टाग्रामवर  या गावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एअरपार्क गावात प्रत्येकाच्या घरासमोर एक विमान असल्याचं दिसून येत आहे.

  प्रत्येकाकडे विमान कसं ?
  अमेरिकेत १९३९ पर्यंत ३४ हजार पायलट होते. मात्र १९४६ मध्ये पायलटची संख्या ४ लाखांच्या वर गेली. जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा अनेक एअरफील्ड आणि पायलट नोकरीतून मोकळे झाले. त्यामुळे अमेरिकेच्या नागरी विमान वाहतूक प्रशासननं निवासी एअरपार्क्स तयार करण्याचं ठरवलं. बंद पडलेल्या मिलिट्री एअरस्ट्रीप्सवर सेवानिवृत्त झालेल्या पायलट्सची राहण्याची सोय करण्यात आली. प्रत्येक घरासमोर विमान असलेल्या या वसाहतींना ‘फ्लाय-इन कम्युनिटिज’ म्हणतात.

  air park village
  एअरपार्कमधील रस्ते इतके रुंद ठेवण्यात आले आहेत की या रस्त्यावरून एक विमान आणि कार सहज जातील. दरम्यान जगभरामध्ये असे ६३० पेक्षा जास्त एअरपार्क आहेत. यामधले ६१० एअरपार्क तर एकट्या अमेरिकेकडे आहेत.