Explosion in gas pipeline; Twelve died on the spot and 100 were seriously injured

चीनमध्ये रविवारी सकाळी गॅस पाईपलाईनमध्ये भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत 12 जणांचा जागीत मृत्यू झाला तर 100 जण गंभीररित्या जखमी झाले. चीनमधील झांगवान जिल्ह्यातील शियान शहरात रविवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान ही घटना घडली.

    बीजिंग : चीनमध्ये रविवारी सकाळी गॅस पाईपलाईनमध्ये भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत 12 जणांचा जागीत मृत्यू झाला तर 100 जण गंभीररित्या जखमी झाले. चीनमधील झांगवान जिल्ह्यातील शियान शहरात रविवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान ही घटना घडली.

    गॅस पाईपलाईनमध्ये झालेल्या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. हा स्फोट इतका भीषण होता की, आसपासच्या इमारतींना तडे गेले. तसेच काही जण ढिगाऱ्याखाली अडकले होते.

    भीती व्यक्त करण्यात येत आहे. यान्हु बाजारात ज्यावेळी स्पटो झाला, त्यावेळी काही जण नाश्ता तर काही जण भाजी खरेदी करत होते. त्यानंतर याची सूचना नगरपालिका कार्यालयाला देण्यात आली. स्फोटात जखमी जालेल्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    हे सुद्धा वाचा