Facebook Spreading Hatred

अमेरिका आणि जगात विद्वेष पसरवून फेसबुक नफा कमवित असल्याचा आरोप करत, फेसबुकमीधल एका सॉप्टवेअर इंजिनिअरने राजीनामा दिला आहे. इंजिनिअर अशोक चंदवानी यांनी लिहिलेले राजीनाम्याचे सविस्तर पत्र वॉशिंग्टन पोस्टमध्ये छापून आले आहे.

वॉशिंग्टन : जगभरात असलेली संपर्क यंत्रणा, जगभरातील ग्राहक, वाचक आणि त्यातून होणारा नफा (Facebook earns profit), या सगळ्याच बाबतीत मार्क झुकरबर्ग यांच्या सोशल मीडिया यंत्रणेतील फेसबुक (Facebook) ही जगभरातील सर्वात मोठी कंपनी म्हणून परिचित आहे. मात्र जगभरातील समस्या सोडविण्यात अशा समाज माध्यमांच्या यंत्रणा अपुऱ्या ठरत असल्याचे मागेच काही समीक्षकांनी नोंदवून ठेवलेले आहे. नुकताच देशातही भाजपाशी संबंधित फेसबुकच्या पोस्टवरुनही असेच वाद रंगले होते.

अमेरिका आणि जगात विद्वेष पसरवून (spreading hatred) फेसबुक नफा कमवित असल्याचा आरोप करत, फेसबुकमीधल एका सॉप्टवेअर इंजिनिअरने (Software engineer) राजीनामा (Resign) दिला आहे. इंजिनिअर अशोक चंदवानी यांनी लिहिलेले राजीनाम्याचे सविस्तर पत्र वॉशिंग्टन पोस्टमध्ये छापून आले आहे. द्वेशातून मिळवण्यात येणारा नफा, हे राजीनाम्याचे कारण असल्याचे चंदवानी यांनी पत्रात नमूद केले आहे.

फेसबुकची मुख्य असलेल्या पंचसुत्रीलाच कंपनीत हरताळ फासला जात असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. जगभरातील विद्वेष फेसबुकच्या व्यासपीठावरुन हटवला जात नसल्याने, कंपनीवरील आपला विश्वास उडाल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

फेसबुकचे कर्मचारी, ग्राहक, कन्सल्टंट, समाजातील विविध संस्था यांच्या दबावानंतरही, हा विद्वेष फेसबुकच्या व्यासपीठावरुन जावा, यात व्यावसायिक मूल्य कंपनीला जाणवत नसल्याचे त्यांनी लिहिले आहे. आपल्याला जसे वाचले तसे फेसबुकच्या इतर कर्मचाऱ्यांनाही वाटत असेल, तर त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी या पत्रातून केले आहे. आपण एकटेच यातून व्यथित झालो आहेत असे नव्हे तर इतर अनेक कर्मचाऱ्यांची हीच भावना असल्याचेही त्यांनी लिहिले आहे.

दरम्यान फेसबुकच्या प्रवक्त्यांनी याबाबत वॉशिंग्टन पोस्टला स्पष्टीकरण दिले हे. त्यात ‘आम्ही विद्वेषातून नफा कमवीत नाही. फेसबुक कम्युनिटी सुरक्षित राहावी यासाठी दरवर्षी आम्ही अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करीत आहोत. याचबरोबर जगभरातील तज्ज्ञांकडून दरवर्षी याबाबतचे मत जाणून घेत, कंपनीच्या धोरणात सुधारणा करत असतो.’ असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.