दहशतवाद आणि जिहादी विचार पसरविणारे सुमारे एक हजार ग्रुप्स फेसबुकने केले बंद, फेसबुकची सिक्रेट यादी लिक, वाचा कोणत्या व्यक्तींचा आणि संघटनांचा समावेश

फेसबुकने जिहादी समुहांवर बंदी घातली आहे, त्या सोबतच, या यादीत युरोपातील सक्रिय व्हाई सुप्रेमिस्ट गट, क्यू क्लुक्स क्लॅन सारख्या द्वेष पसरवणाऱ्या संघटनांचाही समावेश आहे. पहिल्या स्तरावर दहशत आणि हिंसा पसरवणाऱअया संघटना, दुसऱ्या स्तरावर शस्त्रांचा वापर करणाऱ्या विद्रोही संघटना आणि तिसऱ्या स्तरावर शस्त्रांचा वापर करुन होणारी सामाजिक आंदोलने यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

  नवी दिल्ली : काही जण फेसबुकवरील ग्रुप्सचा वापर जगात सशस्त्र आंदोलन पसरवण्यासाठी करत होते, असे सुमारे हजार ग्रुप्स फेसबुकने बंद केले आहेत. फेसबुकची ही आत्तापर्यंतची मोठी कारवाई मानण्यात येते आहे. अशा हिंसक समुहांना दहशतवादी ग्रुप्स मानून त्यांना धोकादायक वैयक्तिक आणि संस्था ( डेंजरस इन्डिविजुअल अँड ऑरगनायझेशन्स) या सूचीत टाकले आहे. या यादीत अनेक दहशतवादी आणि जिहादी संघटनांचा समावेश आहे.

  कोणकोणावर घातली बंदी
  द इंटरसेप्टने फेसबुकने प्रतिबंधित केलेल्या हिंसक ग्रुप्सची यादी प्रकाशित केली आहे. फेसबुकने बंद केलेल्या अनेक ग्रुप्सची नावे, थेट अमेरिकन सरकारकडून घेतल्याचे वृत्त आहे. ज्या हजार ग्रुप्सवर बंदी घालण्यात आली आहे, त्यातील अनेक संघटना, संस्थांना जगात बंदी आहे. ११ सप्टेंबरला अमेरिकेत ट्विन्स टॉवर्सवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर, जगभरातील दहशतवादी संघटनांची यादी अमेरिकेने केली होती, त्या संघटनांवर अजूनही अमेरिकेची नजर आहे.

  या बंद झालेल्या ग्रुप्सच्या यादीवरुन वाद
  फेसबुकने घेतलेल्या या निर्णयाकडे, मुस्लिमांविरोधात अत्याचारातील वाढ या दृष्टीनेही पाहिले जात आहे. फेसबुकच्या सूचीमुळे दोन वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे. यामध्ये मुस्लीमबहुल परिसरात कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत. या नव्या पद्धतीमुळे अमेरिकेप्रमाणे फेसबुकही मुस्लिमांना सर्वात धोकादायक समूह मानत असल्याचा ग्रह तयार होण्याची शक्यता आहे. फेसबुकवर असेही अनेक ग्रुप्स आहेत, ज्याद्वारे मुसलमानांविरोधात मते व्यक्त केली जातात. मात्र फेसबुकने अशा ग्रुप्सवर बंदी घातलेली नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

  फेसबुकची भूमिका
  तर फेसबुकचे याबाबतीतील धोरणकर्ते ब्रायेन फिशमेन यांनी यावर सारवासारव केली आहे. ही सूची व्यापक नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर, हिंसा वाढवणारे अड्डे असा होऊ देणार नाही. जगातील धोकादायक व्यक्ती आणि संघटनांना रोखण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय नसेलही मात्र त्यांची विचारधारा पसरु नये, यासाठी हा चांगला उपाय आहे. असे ट्विट त्यांनी केले आहे. फेसबुक हे एक आभासी, व्हर्चुअल जग आहे. जेवढं शक्य आहे, तिथपर्यंत इथे घडणाऱ्या बाबी या पारदर्शक राहाव्यात, अशी आमची इच्छा आहे. त्याचबरोबर सुरक्षा, कायदेशीर बाबींवरही काम होण्याची गरज आहे. दहशतवाद्यांनी फेसबुकचे व्यासपीठ वापरु नये, अशी आमची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

  यांच्यावरही बंदी
  फेसबुकने जिहादी समुहांवर बंदी घातली आहे, त्या सोबतच, या यादीत युरोपातील सक्रिय व्हाई सुप्रेमिस्ट गट, क्यू क्लुक्स क्लॅन सारख्या द्वेष पसरवणाऱ्या संघटनांचाही समावेश आहे. पहिल्या स्तरावर दहशत आणि हिंसा पसरवणाऱअया संघटना, दुसऱ्या स्तरावर शस्त्रांचा वापर करणाऱ्या विद्रोही संघटना आणि तिसऱ्या स्तरावर शस्त्रांचा वापर करुन होणारी सामाजिक आंदोलने यांचा यात समावेश करण्यात आला आहे. फेसबुकने यापूर्वीही २०२० साली शस्त्रांच्या बळावर सामिजक आंदोलने करणारे ६०० ग्रुप्स निश्चित केले होते. या ग्रुप्सबरोबरच त्यांनी तयार केले २४०० पेजेस आणि १४ हजार २०० ग्रुप्स हटविण्यात आले होते.