trump

जानेवारीत अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या दंगलीनंतर त्यांचे अकाऊंट(Donald Trump Facebook Account) बंद झाले होते. ट्रम्प यांच्यावर हा दंगा भडकवण्याचा आरोप होता.

  न्यूयॉर्क: फेसबुकनं अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट दोन वर्षांसाठी सस्पेंड केलं (Facebook Suspends Donald Trumps account for Two Years) आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर याआधी जानेवारी महिन्यात अनिश्चित कालावधीसाठी बंदी घातली होती.

  जानेवारीत अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या दंगलीनंतर त्यांचे अकाऊंट बंद झाले होते. ट्रम्प यांच्यावर हा दंगा भडकवण्याचा आरोप होता. पण गेल्या महिन्यात फेसबुकच्या मॉनिटरिंग बोर्डाची बैठक झाली होती आणि त्यात ट्रम्प यांच्या खात्यावर अनिश्चित काळासाठी घातलेल्या बंदीबाबत टीका झाली होती.

  बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपात गेलेले नेते पुन्हा तृणमूलमध्ये परत येतील का?

  View Results

  Loading ... Loading ...

  यूएस कॅपिटलमध्ये जानेवारीमध्ये झालेल्या दंग्याबाबत फेसबुकनं म्हटलं होतं, की ट्रम्प यांच्या कृत्यामुळे नियमांचं गंभीर उल्लंघन झालं होतं. फेसबुक आपलं ते धोरणही बंद करणार आहे ज्याअंतर्गत राजकारण्यांना आशयाच्या निरीक्षणातून सूट देण्यात आली होती. आता ही सूट मिळणार नाही. फेसबुकने म्हटले आहे, की आता नेत्यांच्या पोस्टलादेखील कोणतंही सुरक्षा कवच मिळणार नाही. ७ जानेवारीपासून ट्रम्पवरील या बंदीला सुरुवात होईल.तसेच ७ जानेवारी २०२३ पर्यंत ती कायम राहील

  एकीकडे फेसबुकनं ट्रम्प यांचं अकाऊंट बॅन केलं आहे, तर दुसरीकडे नायजेरियानं ट्विटरवर मोठी कारवाई केली आहे. या देशात ट्विटर अनिश्चित कालावधीसाठी सस्पेंड केलं गेलं आहे.