बाथरूममध्ये फ्रान्सच्या राणीचा आरसा,  घरातील मात्र अनभिज्ञ

आरशाला नेपोलियनची पत्नी, महाराणी युजनीकडून खरेदी करण्यात आले होते. ज्यांनी मॅरी एन्टोनेटच्या संपत्तीतून अनेक वस्तू खरेदी केल्या होत्या. कुटुंबातील एका सदस्याला आपल्या आजीकडून हा आरसा वारसा हक्कात मिळाला होता व त्याने बाथरूममध्ये तो लावला होता.

पॅरिस : एक कुटुंब हे जाणून दंग झाले की  त्यांच्या बाथरूमध्ये लावण्यात आलेला एक आरसा फ्रान्सची शेवटची राणी मॅरी अॅन्टोनेट हिचा होता. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, प्राचीन आरसा ४० वर्षांपासून कुटुंबाच्या बाथरूममध्ये लावण्यात आला होता. परंतु ते या आरशाच्या वास्तविक किमतीबद्दल अनभिज्ञ होते. या छोट्या आरशाचा आकार १९.१५ इंच आहे. आता ब्रिटेनच्या ब्रिस्टलमधील एका लिलावात या आरशाच्या विक्रीसाठी कमीत कमी ८ हजार पौंड (७.६ लाख रुपये) एवढी किंमत मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या ब्रिस्टल लिलावानुसार, १८ व्या शतकात आरशाच्या फ्रेममध्ये अक्रोडचे नक्षीकाम केले आहे. फ्रेमवर कोरीव काम केलेली एक चांदीची पट्टी आहे. यावर ‘हा ग्लास मॅरी अॅन्टोनेटच्या नावावर होता व नेपोलियनच्या प्रभावावर खरेदी करण्यात आला होता.

असं सांगितलं जातं की  आरशाला नेपोलियनची पत्नी, महाराणी युजनीकडून खरेदी करण्यात आले होते. ज्यांनी मॅरी एन्टोनेटच्या संपत्तीतून अनेक वस्तू खरेदी केल्या होत्या. कुटुंबातील एका सदस्याला आपल्या आजीकडून हा आरसा वारसा हक्कात मिळाला होता व त्याने बाथरूममध्ये तो लावला होता. त्यांना या आरशाच्या किमतीची काहीच कल्पना नव्हती. चांदीच्या पट्टीवर जे लिहिले होते, त्याकडेदेखील या सदस्यांनी दुर्लक्ष केले. त्यांना ही फक्त गंमत वाटत होती. मॅरी अॅन्टोनेट फ्रान्सची शेवटीची राणी होती. तिने सोळाव्या लुईशी  लग्न केले होते. १७७४ ते १७९२ हा त्यांचा शासनकाळ होता. त्यांना फ्रान्सच्या क्रांतीदरम्यान मारण्यात आले होते.