अमेरिकेचे सुप्रसिद्ध लेखक रँडल केनन यांचं निधन

केनन यांनी काळे आणि समलिंगी लोक (Black and Gay life) याविषयांवर आधारित अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. केनन हे नॉर्थ कॅरोलिना (North Carolina) विद्यापीठात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक (Professor) होते. काल शनिवारी विद्यापीठाने केननच्या मृत्यूची माहिती दिली.

 चॅपल हिल (अमेरिका) : अमेरिकेचे सुप्रसिद्ध लेखक रँडल केनन (Randall Kenan) यांचं काल शुक्रवारी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते ५७ वर्षांचे होते. तसेच केनन यांनी काळे आणि समलिंगी लोक (Black and Gay life) याविषयांवर आधारित अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. केनन हे नॉर्थ कॅरोलिना (North Carolina) विद्यापीठात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक (Professor) होते. काल शनिवारी विद्यापीठाने केननच्या मृत्यूची माहिती दिली.

विद्यापीठातील त्यांचे मित्र आणि सहकारी डॅनियल वॉलेस (Daniel Wallace) यांनी सांगितले की, रँडल केनन यांचा चॅपल हिलजवळील (Chapel Hill) हिल्सबोरो येथे राहत्या घरात मृत्यू झाला. तसेच केनन यांचा मृत्यू कसा झाला? हे अद्यापही अस्पष्ट आहे. केनन यांनी नॉर्थ कॅरोलिना या विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले आणि १९८५ मध्ये त्यांनी विद्यापीठातून पदवी संपादन केली आहे.